---Advertisement---

PBKS Vs KKR: पंजाब किंग्सने टॉस जिंकला कोलकाताला दिले गोलंदाजीचे आमंत्रण

---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेतील 31 वा सामना आज म्हणजेच 15 एप्रिल रोजी पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना पंजाब किंग्सच्या घरेलू मैदानावर खेळला जाणार आहे. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच कोलकाता नाईट रायडर्सला गोलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले आहे.

तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे केकेआरला चॅम्पियन बनवून देणारा कर्णधार श्रेयस अय्यर आज त्यांच्याविरुद्ध पंजाब कडून खेळताना दिसणार आहे. पंजाब किंग्सने आत्तापर्यंत पाच सामन्यांमधील तीन सामने जिंकले आहेत तसेच दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करलेला आहे. तसेच कोलकाताने स्पर्धेतील सहा सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत तर तीन सामने गमावलेले आहेत. पॉईंट्स टेबल मध्ये कोलकाता नाईट रायडर्स पाचव्या क्रमांकावर तर पंजाब किंग्स सहाव्या क्रमांकावर आहे.

दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हन:

पंजाब किंग्स: श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रभसिमरण सिंग, प्रियांश आर्य, ग्लेन मॅक्सवेल, जॉश इंग्लिश, नेहाल वडेरा, शशांक सिंग, मार्को यान्सन, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जेवियर बार्टलेट,

कोलकाता नाईट रायडर्स: अजिंक्य रहाणे (कर्णधार), क्विंटन डीकॉक, सुनील नारायण व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग,आंद्रे रसल, रमनदीप सिंग, हर्षित राणा, एनरिक नॉर्खिया वैभव अरोडा वरून चक्रवर्ती,

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---