fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दिवसावर व्हेरॉक संघाचे वर्चस्व

पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वातजुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दिवसअखेर शुभम तैस्वाल(41-5)याने उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने केडन्स संघाला 224 धावांवर रोखले.

व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी, थेरगांव येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या डावात केडन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. व्हेरॉकच्या अचूक व शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे केडन्सचा डाव 39.3षटकात 224धावांवर संपुष्टात आला. 10 गडी बाद झाल्याने केडन्सची अंतिम धावसंख्या 174झाली.

यात निखिल पराडकरने 88चेंडूत 8चौकार व 1षट्काराच्या मदतीने 86 धावा, तर गणेश गायकवाडने 74 चेंडूत 54 धावा काढून संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण हे दोघेही फलंदाज बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज मोठी खेळी करू शकले नाही. व्हेरॉककडून शुभम तैस्वालने 8 षटकात 41 धावात 5 गडी बाद करून केडन्सचा निम्मा संघ तंबूत परत पाठवला. शुभमला कार्तिक पिल्लेने 23धावात 2 गडी, तर उत्कर्ष अगरवालने 17धावात 1 गडी बाद करून सुरेख साथ दिली.

या आव्हानाचा पाठलाग करताना व्हेरॉक संघाने सावध सुरुवात केली. त्यांनी आज दिवस अखेर 13षटकात 1 बाद 85धावा केल्या. यामध्ये सुधांशु गुंडेतीने संयमपूर्ण खेळी करत 45धावात 48 धावा केल्या. सुधांशु बाद झाल्यानंतर विनय पाटील नाबाद 30धावा, मिझान सय्यद नाबाद 6 धावांवर खेळत आहेत. व्हेरॉक संघाचा उर्वररीत 27 षटकांचा खेळ अजून बाकी आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पहिला डाव: केडन्स: 39.3षटकात सर्वबाद 174(224-50धावा)धावा(निखिल पराडकर 86(88,8×4,1×6), गणेश गायकवाड 54(74,4×4,1×6), इझान सय्यद 21(41), शुभम तैस्वाल 8-41-5, कार्तिक पिल्ले 6-23-2, उत्कर्ष अगरवाल 2-17-1) वि. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 13षटकात 1 बाद 85धावा(सुधांशु गुंडेती 48(45,8×4), विनय पाटील नाबाद 30(41,3×4), मिझान सय्यद नाबाद 6(15), गणेश गायकवाड 2-8-1);

You might also like