---Advertisement---

पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक, पहिल्या डावात अँबिशियस क्रिकेट अकादमीचे युनायटेड स्पोर्टस क्लबवर वर्चस्व

Bat Ball
---Advertisement---

पुणे, दि. 16 ऑक्टोबर 2023 – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित व गोल्डफिल्ड प्रॉपर्टीज प्रायोजित पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात गणेश कलेल(6-20), नीरज जोशी(4-89)यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाने युनायटेड स्पोर्टस क्लबला 131 धावांवर रोखून पहिल्या डावात 52 धावांची आघाडी मिळवून वर्चस्व गाजवले.

बारणे क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत युनायटेड स्पोर्टस क्लबच्या हर्ष ओसवाल(4-16), शिवराज शेळके(3-57), यश बोरकर(2-51) यांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीपुढे अँबिशियस क्रिकेट अकादमीचा डाव 40.4 षटकात सर्वबाद 191 धावावर संपुष्टात आला. यात गौतम पुटगे नाबाद 33, आदित्य जाधव 31, समर्थ वाबळ 31, निरज जोशी 21, ऋत्विक राडे 15, पार्थ दळवी 13 यांनी धावा केल्या. याच्या उत्तरात अँबिशियसच्या गणेश कलेल 6-20, नीरज जोशी 4-89 यांनी भेदक गोलंदाजी करत युनायटेड स्पोर्टस क्लबला 27.1षटकात सर्वबाद 139 धावावर रोखले व संघाला पहिल्या डावात 52धावांची आघाडी मिळवून दिली. यात नील गांधी 28, ईशान खोंड 24 , हर्ष ओसवाल 19, यश बोरकर 18 यांनी थोडासा प्रतिकार केला.

दुसऱ्या डावात अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाने आज दिवस अखेर 12षटकात बिनबाद 30 धावा. केल्या . यात शिव हरपाळे नाबाद 9, ऋत्विक राडे नाबाद 9 धावांवर खेळत आहे. अजून दोन्ही संघातील एक दिवसाचा खेळ शिल्लक आहे.

डिझायर स्पोर्टस कॉर्पोरेशनवर सुरु असलेल्या या दोन दिवसीय लढतीत प्रथम फलंदाजी करताना स्टार क्रिकेट क्लब संघाला 62.2 षटकात सर्वबाद 266धावापर्यंत मजल मारता आली. यात अनिकेत पठारेने सर्वाधिक 89चेंडूत 11चौकार व 1षटकारसह 82 धावा चोपल्या. त्याला ओंकार मोगलने 104चेंडूत 10 चौकरसह 62. धावा काढून साथ दिली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 160 चेंडूत 132धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर यशने 69चेंडूत 11चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 60 धावा, तर ओमकार कदम 21, सागर पवार 31 धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. क्लब ऑफ महाराष्ट्र संघाकडून विशाल पारिक(4-57), यश हाळे(2-25), श्रीनिवास गाडे(1-15) यांनी सुरेख गोलंदाजी करत स्टार संघाला मोठे आव्हान उभरण्यापासून रोखले.

याच्या उत्तरात क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने आज दिवस अखेर 22षटकात 2बाद 78 धावा केल्या. यात ऋषीकेश त्रिगुने 24, अक्षित इंगळे 14 धावा काढून बाद झाले. तर केदार बजाज नाबाद 14 धावांवर खेळत आहे. दोन्ही संघातील अजून एक दिवसाचा खेळ शिल्लक आहे. (PYC Goldfield Raju Bhalekar Smriti Trophy, Ambitious Cricket Academy dominates United Sports Club in first innings)

स्पर्धेचा सविस्तर निकाल:
डिझायर स्पोर्टस कॉर्पोरेशन:
पहिला डाव: स्टार क्रिकेट क्लब: 62.2 षटकात सर्वबाद 266धावा (अनिकेत पठारे 82(89,11×4,1×6), ओंकार मोगल 62(104,10×4), यश 60(69,11×4,1×6), ओमकार कदम 21, सागर पवार 31, विशाल पारिक 4-57, यश हाळे 2-25, श्रीनिवास गाडे 1-15) वि. क्लब ऑफ महाराष्ट्र: 22षटकात 2बाद 78 धावा (ऋषीकेश त्रिगुने 24, अक्षित इंगळे 14, केदार बजाज नाबाद 14, पुष्कराज पाटील 2-12);

बारणे क्रिकेट मैदान:
पहिला डाव: अँबिशियस क्रिकेट अकादमी:40.4 षटकात सर्वबाद 191 धावा(गौतम पुटगे नाबाद 33(31,5×4), आदित्य जाधव 31(40,3×4, 3×6), समर्थ वाबळ 31(28,5×4), निरज जोशी 21, ऋत्विक राडे 15, पार्थ दळवी 13, हर्ष ओसवाल 4-16, शिवराज शेळके 3-57, यश बोरकर 2-51) वि. युनायटेड स्पोर्टस क्लब: 27.1षटकात सर्वबाद 139 धावा (नील गांधी 28, ईशान खोंड 24 , हर्ष ओसवाल 19, यश बोरकर 18, गणेश कलेल 6-20, नीरज जोशी 4-89); अँबिशियस क्रिकेट अकादमी सांघाकडे पहिल्या डावात 52 धावांची आघाडी;

दुसरा डाव: अँबिशियस क्रिकेट अकादमी: 12षटकात बिनबाद 30 धावा (शिव हरपाळे नाबाद 9, ऋत्विक राडे नाबाद 9) वि. युनायटेड स्पोर्टस क्लब:

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---