fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

एमएसएलटीए अखिल महाराष्ट्र आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पीवायसी अ, पीवायसी क संघांची विजयी सलामी

पुणे । महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या तर्फे व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए अखिल महाराष्ट्र आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पीवायसी अ व
पीवायसी क या संघांनी अनुक्रमे जिल्हा ब व जिल्हा अ संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात पीवायसी अ संघाने जिल्हा ब संघाचा 22-11 असा पराभव करून विजयी सलामी दिली.

सामन्यात 110वयोगट दुहेरी गटात पीवायसी संघाच्या डॉ.जमेनिस व हिमांशू गोसावी यांना जिल्हा ब संघाच्या डॉ.प्रदीप कुंचुर व राजीव देसाई यांनी 4-6 असे पराभूत संघाला आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर 90 अधिक गटात पराग नाटेकर व हेमंत बेंद्रे या जोडीने डॉ.विरेंद्र अतनूर व हर्ष कन्ना यांचा 6-3असा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली.

खुल्या दुहेरी गटात पीवायसीच्या केतन धुमाळने प्रशांत सुतारच्या साथीत जिल्हा ब संघाच्या राहुल सुवर्णा व पृथ्वीराज इंगळे यांचा 6-2 असा तर खुल्या दुहेरी गटात पीवायसीच्या अभिषेक ताम्हाणे व रितू कुलकर्णी यांनी जिल्हा ब संघाच्या यती गुजराती व सूर्यवंशी या जोडीचा 6-0 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.

दुसऱ्या सामन्यात केदार शहा, अर्जुन चितळे, अनुप मिंडा, वरून मांगीकर, जयंत कढे, अमित नाटेकर यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी क संघाने जिल्हा अ संघाचा 22-16 असा पराभव करून शानदार सुरुवात केली.

स्पर्धेचे उदघाटन एमएसएलटीएचे माजी अध्यक्ष शरद कन्नमवार आणि एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजीव देसाई, कौस्तुभ शहा, शितल भोसले आणि अभिषेक ताम्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पीवायसी अ वि.वि.जिल्हा ब 22-11 (110वयोगट दुहेरी गट: डॉ.जमेनिस/हिमांशू गोसावी पराभूत वि.डॉ.प्रदीप कुंचुर/राजीव देसाई 4-6; 90अधिक गट: पराग नाटेकर/हेमंत बेंद्रे वि.वि.डॉ.विरेंद्र अतनूर/हर्ष कन्ना 6-3; खुला दुहेरी गट:केतन धुमाळ/प्रशांत सुतार वि.वि.राहुल सुवर्णा/पृथ्वीराज इंगळे 6-2; खुला दुहेरी गट: अभिषेक ताम्हाणे/रितू कुलकर्णी वि.वि.यती गुजराती/सूर्यवंशी 6-0);

पीवायसी क वि.वि.जिल्हा अ 22-16(110वयोगट दुहेरी गट: सत्यव मूर्ती/योगेश पंतसचिव पराभूत वि.डॉ.दिनेश शिंगटे/शितल भोसले 4-6; 90अधिक गट: जयंत कढे/अमित नाटेकर वि.वि.डॉ.अक्रम खान/विजय मेहेर 6-5(3); खुला दुहेरी गट: केदार शहा/अर्जुन चितळे वि.वि.मेहुल केनिया/निलेश सावंत 6-1; खुला दुहेरी गट: अनुप मिंडा/वरून मांगीकर वि.वि.श्रीकांत कुमावत/किरण कुलकर्णी 6-4).

You might also like