क्रिकेटचा विश्वचषक संपत नाही तोच फुटबॉलचा विश्वचषक (FIFA World Cup)सुरू होणार आहे. तसे पाहिले तर फुटबॉल विश्वचषक स्पर्धेची वेळही चुकली आणि ठिकाणही. नेहमीप्रमाणे युरोपियन देशांमध्ये होणारा फुटबॉलचा विश्वचषक पहिल्यांदाच अरबी देशांमध्ये खेळला जाणार आहे. फुटबॉल विश्वचषकाचे हे 22वे पर्व असून त्याची सुरूवात 20 नोव्हेंबर पासून होणार आहे, तर अंतिम सामना 18 डिसेंबरला खेळला जाणार आहे.
जेव्हापासून कतारला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले तेव्हापासून अनेक दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली. त्यातच शनिवारी (5 नोव्हेंबर) बुंदेसलीगामध्ये बायर्न म्युनिक विरुद्ध हेर्था सामना खेळला गेला. हा सामना बर्लिनच्या ऑलिम्पियास्टॅडियनमध्ये खेळला गेला. हे हेर्थाचे घरचे मैदान असून या सामन्यादरम्यान चाहत्यांनी कतार फुटबॉल विश्वचषकाला रद्द करा असा नारा दिला. त्याला कारणच तसे आहे.
ऑलिम्पियास्टॅडियन येथे बायर्न म्युनिक विरुद्ध हर्था बर्लिनच्या सामन्यात घरच्या चाहत्यांनी एक बॅनर प्रदर्शित केला. ज्यावर “फुटबॉलच्या 5,760 मिनिटांसाठी 15,000 मृत्यू – तुम्हाला लाज वाटते”, असे लिहिले होते. हा सामना बार्यनने 3-2 असा जिंकला.
सरकारी आकडेवारी पाहिली तर 2010 पासून ते 2019 मध्ये कतारने आयोजनाच्या हक्कांसाठी बोली जिंकली तेव्हापासून देशात 15,021 मजुरांचा (जे कतारचे नागरिक नव्हते) मृत्यू झाला आहे. तसेच, अॅम्नेस्टी इंटरनॅशनल असा दावा केला आहे की मृत्यूच्या कारणांचा पुरेसा तपास केला गेला नाही, ज्यामुळे खरा आकडा काय हे अद्याप अस्पष्टच आहे.
Anche oggi in Bundesliga i tifosi contestano i Mondiali di #Qatar2022: dopo lo striscione mostrato nello scorso turno, anche oggi contro il Bochum i fan del Borussia Dortmun hanno chiesto il boicottaggio del torneo.
— Pallonate in Faccia (@pallonatefaccia) November 5, 2022
हे काही या सामन्यापुरतेच मर्यादित नाही, दुसरा सामना बोरूसिया डॉर्टमंड आणि व्हीएफएल बोचम सिग्नल इडुना पार्क येथे यांच्यात खेळला गेला. डॉर्टमंडचे हे घरचे मैदान असून घरच्या चाहत्यांनी “बॉयकॉट कतार 2022” असे बॅनर झळकावले. हा सामना डॉर्टमंडने 3-0 असा जिंकला.
Bayern Munich fans: “Hey Ostkurve, any arguments for #Qatar2022?”
Hertha Berlin’s fan groups:
“No press freedom, women’s rights”
“Persecution of sexual orientations”
“Human rights abuses”
“Sportswashing”
“Guest workers exploited”Banner in both stands: “Shame on you!” pic.twitter.com/jomKn6qBkY
— Felix Tamsut (@ftamsut) November 6, 2022
या दोन्ही सामन्यांमधील चाहत्यांनी प्रदर्शित केलेल्या बॅनरचे फोटो, पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. कतारमध्ये विश्वचषक स्पर्धा खेळवू नका, असा दावा अनेक दिग्गज फुटबॉलपटूंंनी केला.
ह्युमन राइट्सच्या रिपोर्ट्सनुसार कतारमध्ये कामाचे अधिक तास, आरोग्य आणि सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष, वेतन न देणे यासारख्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले होते. मागे एका वृत्तपत्राने केलेल्या चौकशीत, विश्वचषकाची तयारी सुरू झाल्यापासून 6500 हून अधिक कामगारांचा मृत्यू झाला होता.
या विश्वचषकासाठी 8 नवे स्टेडियम बांधण्यात आले. त्यासाठी मोठ्या प्रमाणात विदेशातील मजूर काम करायला कतारला पोहोचले, मात्र त्यातील अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतासाठी 2011, पाकिस्तानसाठी 1992; यावेळी टी20 वर्ल्ड कपमध्ये कोणाच्या योगायोगाचे पारडे जड, घ्या जाणून
फलंदाजीत फ्लॉप ठरलेल्या रोहित शर्माने मोडला बाबर आझमचा विक्रम, बनला ‘असे’ करणारा पहिला कर्णधार