मुंबई। महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 16व्या एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल 12वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या सौम्या तमंग, हरियाणाच्या जास्मिन कौर यांनी तर, मुलांच्या गटात मध्यप्रदेशच्या विवान बिदासरिया या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात क्वालिफायर महाराष्ट्राच्या सौम्या तमंगने हरियाणाच्या आठव्या मानांकित अविकाचा 6-0, 6-2 असा एकतर्फी पराभव केला. हरियाणाच्या बिगरमानांकित जास्मिन कौर हिने कर्नाटकाच्या पाचव्या मानांकित सृष्टी किरणचा 7-5, 6-4 असा पराभव करून आगेकूच केली.
मुलांच्या गटात मध्यप्रदेशच्या विवान बिदासरिया याने हरियाणाच्या चौथ्या मानांकित शिव शर्माचे आव्हान 6-0, 6-3 असे मोडीत काढले. महाराष्ट्राच्या दक्ष पाटीलने क्वालिफायर तामिळनाडूच्या वरुण विजयकुमारचा 4-6, 6-1, 6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. महाराष्ट्राच्या शौनक सुवर्णा याने आपलाच राज्य सहकारी आराध्य म्हसदेचा टायब्रेकमध्ये 7-6(2), 6-2 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : उप-उपांत्यपूर्व फेरी: मुले:
तविश पाहवा(हरियाणा)[1] वि.वि.पुरहन यादव(हरियाणा)[16] 6-0, 6-2;
दक्ष पाटील(महाराष्ट्र)वि.वि.वरुण विजयकुमार(तामिळनाडू) 4-6, 6-1, 6-4;
विवान बिदासरिया(मध्यप्रदेश) वि.वि.शिव शर्मा(हरियाणा)[4] 6-0, 6-3;
हृतिक कटकम(तेलंगणा)वि.वि.प्रणित चिट्टीपोदोरगरी(तेलंगणा)[9] 6-1, 6-0;
शौनक सुवर्णा(महाराष्ट्र)वि.वि.आराध्य म्हसदे(महाराष्ट्र) 7-6(2), 6-2;
कुशाग्र अरोरा()[3]वि.वि.प्रज्ञेश शेळके(महाराष्ट्र)[15] 6-2, 6-0;
विराज चौधरी(दिल्ली)[5]वि.वि.विवान मिरधा(राजस्थान)[12] 6-2, 6-0;
फजल अली मीर(तामिळनाडू)[2]वि.वि.दर्श खेडेकर(महाराष्ट्र) 6-0, 6-0;
मुली:
आनंदिता उपाध्याय(हरियाणा)[1] वि.वि.रितिका डावलकर(महाराष्ट्र) 6-3, 6-1;
सौम्या तमंग(महाराष्ट्र)वि.वि.अविका(हरियाणा)[8] 6-0, 6-2;
हविशा चौधरी(राजस्थान)[4]वि.वि.इरा देशपांडे(महाराष्ट्र)7-5, 6-1;
पार्थसारथी मुंडे(महाराष्ट्र)[10]वि.वि.मिरया अगरवाल(उत्तरप्रदेश)[6] 6-0, 6-1;
जास्मिन कौर(हरियाणा)वि.वि.सृष्टी किरण(कर्नाटक)(5) 7-5, 6-4
प्राची मलिक(हरियाणा)[3]वि.वि.व्रणदिका राजपूत(महाराष्ट्र) 6-3, 6-0
एरवा सानवी रेड्डी(तेलंगणा)वि.वि.कार्तिका पद्माकुमार(कर्नाटक)6-3, 6-0
आहान(ओडिशा)[2]वि.वि.रितीशा चौधरी 6-0, 6-0
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितबरोबर केएल राहुल नाही, तर ‘या’ खेळाडूने करावी कसोटीत ओपनिंग, दिग्गजाचा सल्ला
‘या’ खेळाडूंनी करावी ओपनिंग, तर रोहितने तिसऱ्या क्रमांकावर लढवावा किल्ला; पाहा कोण म्हणतंय
पंजाब किंग्समध्ये मयंक घेणार केएल राहुलची जागा? फ्रँचायझी मोठी जबाबदारी सोपण्याची शक्यता