भावनी माता मैदान दादर (पूर्व) येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धात आज सायंकाळी शिल्लक असलेले साखळी सामने खेळवण्यात आले. साखळीतील निकाल नंतर पुरुष विभागातुन ८ तर महिला विभागातून ८ संघांनी बादफेरीत प्रवेश केला.
देना बँक विरुद्ध जे.जे. हॉस्पिटल यांच्यात झालेल्या महत्वपूर्ण लढतीत देना बँक संघाने ५३-३१ असा विजय मिळवला. नितीन देशमुखच्या ५ गुणांच्या सुपररेडने सामना देना बँककडे फिरवला. मध्यंतरापर्यंत ३५-१८ अशी देना बँक कडे आघाडी होती. ड गटात विजय मिळवला, तर जे. जे. हॉस्पिटल गटातुन उपविजयी झाले.
अ गटातील महत्वापूर्ण सामन्यात एयर इंडिया विरुद्ध बँक ऑफ इंडिया यांच्यातील सामना अटीतटीचा झाला. मध्यंतरापर्यत १२-११ अशी शुल्लक आघाडी बँक ऑफ इंडिया कडे होती. एयर इंडियाने २८-२७ असा विजय मिळवत गटात विजय मिळवला. रायगड पोलीस विरुद्ध युनियन बँक यांच्यातील लढत युनियन बँक संघाने २१-१९ असा विजय मिळवत बादफेरीत प्रवेश मिळवला.
महिला विभागात शिवशक्ती मुंबई संघाने जागृती पुणे संघाला ३५-१८ असे नमवत गटात विजय संपादन केला. डॉ. शिरोडकर स्पो. संघाने सुवर्णयुग संघाविरुद्ध २५-२० असा विजय मिळवत बादफेरीत प्रवेश मिळवला. महिला ड गटातील एक सामना सुरू असून बादफेरीचे सामने पुढील प्रमाणे.
महिला विभाग उपांत्यपूर्व फेरीचे सामने:
१) शिवशक्ती म. संघ मुंबई विरुद्ध ड गटातील उपविजयी
२) स्वराज्य उपनगर विरुद्ध संघर्ष, उपनगर
३) महात्मा गांधी स्पो. उपनगर विरुद्ध डॉ. शिरोडकर स्पो. मुंबई
४) जागृती, पुणे विरुद्ध ड गटातील विजयी
पुरुष विभाग उपांत्यपूर्व फेरीचे सामने:
१) एयर इंडिया विरुद्ध जे. जे. हॉस्पिटल
२) सेन्ट्रल बँक विरुद्ध रायगड पोलीस
३) महिंद्रा अँड महिंद्रा विरुद्ध युनियन बँक
४) देना बँक विरुद्ध बँक ऑफ इंडिया
महत्त्वाच्या बातम्या-
–कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण चषक, दादरच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाचे निकाल