लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएल २०२२चा ४२वा सामना झाला. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर झालेला हा सामना लखनऊने २० धावांनी जिंकला. या सामन्यादरम्यान लखनऊचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक याने असे काही केले, ज्यासाठी त्याचे कौतुक होत आहे. पंजाबविरुद्ध डी कॉकने खेळ भावनेचे उत्तम उदाहरण दिले आहे.
लखनऊ विरुद्ध पंजाब (LSG vs PBKS) सामन्याची सुरुवात चांगली राहिली नाही. कारण शानदार फॉर्ममध्ये असलेला लखनऊचा कर्णधार केएल राहुल केवळ ६ धावा करून पव्हेलियनला परतला. त्यानंतर सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या डी कॉकने (Quinton De Kock) दीपक हुड्डासोबत मिळून दुसऱ्या विकेटसाठी ५९ चेंडूत ८५ धावांची भागीदारी रचली.
लखनऊकडून त्याने २ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने सर्वाधिक ४६ धावा केल्या. परंतु त्याच्या खेळीपेक्षा जास्त त्याच्या बाद होण्याची अधिक चर्चा झाली. लखनऊच्या डावातील १३ व्या षटकादरम्यान संदिप शर्माचा (Sandeep Sharma) चेंडू डी कॉकच्या बॅटच्या बाहेरच्या कडेला लागून मागे यष्टीरक्षकाच्या हातात गेला.
यावर पंजाबच्या खेळाडूंनी मैदानी पंचांकडे अपील केली, परंतु पंचांनी त्यावर कोणताही निर्णय दिला नाही. मात्र डी कॉकला माहिती होते की, चेंडू त्याच्या बॅटला लागला आहे. त्यामुळे डी कॉक पंचांनी निर्णय देण्यापूर्वीच पव्हेलियनला (De Kock Walks After Edging Ball) जाण्यासाठी निघाला. डी कॉकने स्वतहून पव्हेलियनचा रस्ता धरल्याने खुश होऊन गोलंदाज संदिप शर्माने डी कॉकची पाठ थोपटली आणि त्याच्या खेळ भावनेचे कौतुक (Quinton De Kock Sportsmanship)केले. केवळ संदिप शर्माच नव्हे तर, क्रिकेटप्रेमीही डी कॉकच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक करत आहेत.
https://twitter.com/VaishnaviS45/status/1520059710501965824?s=20&t=ra3du2qLyaJjPGz6LiVZKg
ICYMI – Spirit of cricket: Quinton de Kock walks after edging the ball.
????️????️https://t.co/u1Htv2n2F4 #TATAIPL #PBKSvsLSG
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2022
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, लखनऊने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर १५३ धावा केल्या. यामध्ये डी कॉकच्या ४६ धावांच्या खेळीबरोबरच दीपक हुड्डाच्या ३४ धावा आणि दुष्मंथा चमीराच्या १७ व मोहसीन खानच्या नाबाद १३ धावांचा समावेश होता. या डावात पंजाबकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात पंजाबकडून जॉनी बेयरस्टोने सर्वाधिक ३२ धावा केल्या. तसेच कर्णधार मयंक अगरवालने २५ धावा आणि रिशी धवनने नाबाद २१ धावा केल्या. या डावात लखनऊकडून मोहसिन खानने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच दुष्मंथा चमीरा आणि कृणाल पंड्या यांनीही प्रत्येकी २ विकेट्सचे योगदान दिले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित होता मधल्या फळीतील फलंदाज, ‘या’ सामन्यात मिळाली होती सलामीला संधी
मोठी बातमी! लखनऊ सुपरजायंट्सच्या सदस्याचा कार अपघात, गौतम गंभीरचा मॅनेजरही होता सोबत
वाढदिवस विशेष – ‘हिटमॅन’ अशी ओळख मिळवलेल्या रोहित शर्माबद्दल फारशा माहित नसलेल्या १० गोष्टी