आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 42वा सामना शुक्रवारी (10 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान संघात खेळला गेला. हा सामना जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअम असलेल्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळवण्यात आला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत अफगाणिस्तानला 244 पर्यंत रोखले. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक याने विश्वचषक इतिहासातील एका विक्रमाची बरोबरी केली.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या सर्व वेगवान गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना सादर केला. त्याला सर्व क्षेत्ररक्षक व यष्टीरक्षक यांनी साथ दिली. यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक याने यादरम्यान वन डे क्रिकेट मधील आपली यष्ट्यांमागील मागील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. त्याने या सामन्यात तब्बल सहा झेल टिपले.
वनडे विश्वचषक इतिहासात यष्टीरक्षक म्हणून एका डावात सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत त्याने ऑस्ट्रेलियाच्या ऍडम गिलख्रिस्ट याची बरोबरी केली. त्याने 2003 विश्वचषकात नामी बिहार विरुद्ध सहा झेल घेतले होते. भारताच्या सय्यद किरमानी यांनी 1983 मध्ये झिंबाब्वे विरुद्ध एका डावात पाच झेल घेतले होते. तर न्यूझीलंड चार रिडली जेकब यांनी 1999 मध्ये एका डावात पाच झेल घेण्याची कामगिरी करून दाखवलेली.
(Quinton de Kock took 6 Catches In An ODI World Cup Inning)
हेही वाचा-
दिनेश कार्तिकच्या खांद्यावर पुन्हा कर्णधारपदाची धुरा, ‘या’ संघाचं करणार नेतृत्व
‘प्रामाणिकपणे सांगतो, मला फरक पडत नाही…’, ICC वनडे रँकिंगमध्ये नंबर 1 बनूनही असे का म्हणाला भारतीय धुरंधर?