अखेर फिरकीपटू आर अश्विनने बदललं आपलं नाव

भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज आर. अश्विनने कोरोना व्हायरसमुळे आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरील नाव बदलले आहे. सध्या भारतामध्ये कोरोना व्हायरसा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. याचमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन केले आहे. या व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्व लोकांना घरामध्येच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यादरम्याने अश्विनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरील नाव बदलून ‘चला भारतीयांनो घरात राहुया’ (Lets Stay Indoors India) असे ठेवले आहे. त्याने आपले नाव बदलून एकप्रकारे भारतीयांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे.

यादरम्यान त्याने कोविड-१९ व्हायरसबद्दल ट्वीट केले होते की, “सर्व मार्गदर्शक सूचना पाहिल्या तर एक गोष्ट लक्षात येते की, पुढील २ आठवडे खूप महत्त्वाचे असतील. पुढील २ आठवड्यात भारतातील प्रत्येक शहर हे मोकळे दिसले पाहिजे. कारण जर हा आजार वाढला तर परिस्थिती बिघडू शकते.”

यावेळी अश्विनने लोकांना कोरोना व्हायरसपासून (Corona Virus) संरक्षण करण्यासाठी मार्ग सांगितले आहेत. त्याने लोकांना सल्ला दिला होता की, लोकांनी आपल्या घरामध्येच राहिले पाहिजे. घरातील साफ-सफाईवर लक्ष द्या. हात स्वच्छ धुवा. तसेच गर्दीच्या ठिकाणांपासून दूर रहा. तसेच सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे आणि आदेशांचे पालन करा.

ट्रेंडिंग घडामोडी-

-टाॅप ५- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले महारथी

-टॉप ५- असे खेळाडू ज्यांनी लावला होता मॅन ऑफ द सिरीजचा रतीब

-वेळच अशी आलीय की २४ शतकं केलेला हा खेळाडूही करतोय टाॅयलेट साफ

You might also like