fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

किंग्ज ११ पंजाब सोडून दिल्ली संघात जाण्याचे कारण अखेर अश्विनने सांगितलेच

R Ashwin Finally Opens Up on IPL Auction Trading Reveals Why Left KXIP and Joins Delhi Capitals

नवी दिल्ली । आयपीएल २०२० लिलावापूर्वी खेळाडूंना घेण्यासाठी अनेक उलटफेर झाले होते. आयपीएल फ्रंचायझींनी यादरम्यान वेळेचा चांगला उपयोग केला आणि त्यांनी काही खेळाडूंची एकमेकांमध्ये अदलाबदल केली होती. याच अदलाबदलीमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार आणि भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज आर अश्विनला आयपीएलच्या १३व्या मोसमासाठी पंजाब संघाने दिल्ली कॅपिटल्सशी ट्रेड केले.

आश्चर्याची बाब म्हणजे संपूर्ण ट्रेडिंग विंडोदरम्यान सलग अश्विनला (R Ashwin) ट्रेड करण्याशी नकार देणारे पंजाबचे मालक नेस वाडियाने (Ness Wadia) विंडो बंद होण्याच्या एक आठवड्यापूर्वीच दिल्लीबरोबर त्याला ट्रेड केले होते.

अश्विनने सांगितले किंग्ज इलेव्हन पंजाब सोडण्याचे कारण-

आयपीएलचा लिलाव होऊन आता जवळपास ५ महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला आहे. आता अश्विनने किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) संघाला सोडून दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघामध्ये जाण्याचे का ठरवले, याचा खुलासा केला आहे.

नुकत्याच दिल्ली कॅपिटल्सबरोबर झालेल्या लाईव्ह चॅटदरम्यान अश्विन म्हणाला होता की, दिल्ली कॅपटिल्सला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणारा अव्वल संघ बनवायचे होते. त्यासाठी त्याने पंजाब सोडून दिल्लीमध्ये जायचे ठरवले.

आपल्या अनुभवाने दिल्ली कॅपिटल्सला विजेतेपद जिंकण्यासाठी मदत करू शकतो-

अश्विनने म्हटले की, “मी अशा संघात सामील होत होतो ज्याने मागील वर्षी सर्वांना आश्चर्यचकीत करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते. या संघात रिषभ पंत (Rishabh Pant) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांसारखे अनेक प्रतिभाशाली खेळाडू आहेत.”

“मला वाटले की, माझा अनुभव दिल्ली संघाला विजेतेपद मिळवून देऊ शकतो. तसेच संघाला आणखी चांगले बनवू शकतो. जर मला गोलंदाजी मजबूत करता आली तर आम्ही आयपीएल विजेतेपदाच्या शर्यतीमधील एक संघ बनू शकतो. मी हाच विचार घेऊन संघात आलो आहे,” असेही तो यावेळी म्हणाला.

अश्विनने २ मोसमात केले किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व-

विशेष म्हणजे पंजाबच्या संघाने अश्विनला २०१८मध्ये आयपीएल लिलावात ७.६० कोटी रुपयांमध्ये संघात सामील केले होते. यानंतर त्याने २ वर्षांपर्यंत संघाचे नेतृत्व केले. यादरम्यान त्याने सुरुवात तर चांगली केली. परंतु त्याला हवी तितकी चांगली कामगिरी करता आली नाही. पंजाब संघ पुन्हा एकदा क्वालिफाय होण्यात अपयशी ठरला.

अश्विन व्यतिरिक्त भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेदेखील दिल्ली कॅपिटल्समध्ये या मोसमात सामील झाला आहे. हे दोन्ही अनुभवी खेळाडू आयपीएलमध्ये युवा खेळाडू श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणार आहेत.

तसेच पंजाबने केएल राहुलला (KL Rahul) आपला नवीन कर्णधार बनवले आहे. याबरोबरच त्यांनी आपल्या प्रशिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये अनिल कुंबळेचाही (Anil Kumble) समावेश केला आहे. कुंबळेने भारतीय क्रिकेट संघ, मुंबई इंंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरबरोबर काम केले आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-२० वर्षांच्या मुलाने महेंद्रसिंग धोनीला दिले चॅलेंज, समजून घ्या काय आहे नक्की किस्सा

-पाकिस्तानमधील मानवधिकार कार्यकर्ता म्हणतो, आफ्रिदी थोडी तरी लाज बाळग

-विश्वास नाही बसणार पण हे खरंय; जगातील ‘या’ १० महान गोलंदाजांनी कारकिर्दीत एकही…

You might also like