इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा दुसरा टप्पा येत्या १९ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर १७ ऑक्टोबर पासून युएई आणि ओमानमध्ये टी -२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कसून तयारीला सुरुवात केली आहे. दरम्यान बीसीसीआयने देखील भारताचा १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
भारतीय संघात अनेक मोठे बदल करण्यात आले होते. काही दिग्गज खेळाडूंना संघाबाहेर करण्यात आले, तर काहींना पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली आहे. यात सर्वात मोठे नाव म्हणजे आर अश्विन. गेली काही वर्ष आर अश्विनला वनडे आणि टी-२० संघात संधी दिली जात नव्हती. परंतु, यंदा तो टी -२० विश्वचषक स्पर्धेतून तो निळ्या रंगाच्या जर्सीत पुनरागमन करणार आहे.
आर अश्विनला संघात स्थान मिळाल्यानंतर सर्वांनाच आश्चर्य झाले होते. दरम्यान, त्याची निवड झाल्यानंतर निवडकर्ते चेतन शर्मा यांनी स्पष्ट केले होते की, अश्विनची आयपीएल स्पर्धेतील जबरदस्त कामगिरी पाहता त्याला या संघात स्थान देण्यात आले आहे. युएईची खेळपट्टी अश्विनसाठी लाभदायक ठरू शकते. तसेच तो फलंदाजीमध्ये ही मोलाचे योगदान देऊ शकतो.
अश्विनने २०१६ मध्ये शेवटचा टी-२० विश्वचषक खेळला होता. त्यानंतर तो आता २०२१ टी -२० विश्वचषक खेळणार आहे. अश्विन टी-२० क्रिकेटमध्ये देखील अनेक दिग्गज फलंदाजांना अडचणीत टाकतो. तसेच त्याच्या नावे भारतीय संघासाठी टी -२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम आहे.
अश्विनने टी-२० विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत २० गडी बाद केले आहेत. तसेच टी -२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी इरफान पठाण आहे. इरफान पठाणने भारतीय संघासाठी एकूण १६ गडी बाद केले आहेत. तर इरफान पठाणसह दुसऱ्या स्थानी हरभजन सिंग देखील आहे. हरभजन सिंगने देखील १६ गडी बाद केले आहेत.
तसेच भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. नेहराने टी -२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी एकूण १५ गडी बाद केले आहेत.(R Ashwin has taken most wickets in T20 World cups in india)
टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज
२० गडी – आर अश्विन
१६ गडी – इरफान पठाण
१६ गडी – हरभजन सिंग
१५ गडी – आशिष नेहरा
१४ गडी – आरपी सिंग
१४ गडी – रवींद्र जडेजा
महत्त्वाच्या बातम्या –
‘मला नेहमीच तुला भांडण करण्यापासून आडवायला लागायचं’, गंभीरच्या ‘त्या’ पोस्टवर युवीची कमेंट
चिंटू ते बबलू, तुमच्या लाडक्या भारतीय क्रिकेटपटूंची ड्रेसिंग रुममध्ये आहेत ‘ही’ टोपण नावं
फक्त इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलेल्या क्रिकेटर्सची खास ‘प्लेईंग इलेव्हन’