भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया त्यांच्याच देशात बॉर्डर गावसकर मालिकेत 2-1 अशा फरकाने मात देत सलग दुसर्यांदा मालिका जिंकली. त्याचबरोबर भारतीय संघाने गाबा येथील चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला 32 वर्षांनंतर प्रथमच ऑस्ट्रेलिया पराभूत केले. त्यामुळे भारतीय संघाने एक ऐतिहासिक विजय प्राप्त केला. या मालिकेदरम्यान भारतीय संघाला बर्याच चढ -उतारांचा सामना करावा लागला. त्यामुळे हा विजय भारतीय संघ कधीच विसरणार नाही.
आता भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन मायदेशी परतला आहे. त्याने ऑस्ट्रेलियातून माघारी येत असताना ऑस्ट्रेलिया मालिकेत झालेल्या सर्व आठवणी पुन्हा एकदा जाग्या केल्या. भारतीय संघाचा फिरकीपटू अश्विन आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर चर्चा करत असलेले एका व्हिडिओत दिसत आहे. या दरम्यान अश्विनने मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांची नक्कल करताना मेलबर्न येथे दुसर्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथला कसे बाद करायचे ठरवले होते, त्या योजनेचा खुलासा केला आहे.
ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथची या मालिकेच्या सुरुवात चांगली झाली नव्हती. त्याला भारतीय फिरकीपटू आश्विनने खूप त्रास दिला होता. अश्विनने ऍडलेडमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात स्मिथला खेळपट्टीवर टिकूच दिले नव्हते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा स्टीव्ह स्मिथवर चांगली कामगिरी करण्याचा दबाव वाढला. त्याचबरोबर नाणेफेक हारल्यानंतर वेगवान गोलंदाजांना मदत मिळणार्या खेळपट्टीवर रवि शास्त्री यांची इच्छा होता.की अश्विनने लवकरात लवकर गोलंदाजीला येऊन भारतीय गोलंदाजीचा मोर्चा सांभाळावा.
ASHHHHHHHHHHH. GET THE BALL IN THE FIRST TEN OVERS 🤣🤣@RaviShastriOfc MASTERSTROKE AT THE 'G pic.twitter.com/9j92nY5H7A
— @ravimaestri (@ravimaestri) January 21, 2021
अश्विनने हा सर्व घटनाक्रम आठवून क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर सांगितला. या व्हिडिओत अश्विन बोलताना दिसत आहे की, “आपण नाणेफेक हरल्यानंतर रवि शास्त्री माझ्याकडे आले आणि म्हणाले ‘ऍश’. मी तेव्हा पँट घालत होतो आणि अचानक मागे वळून पाहिले. मी म्हणालो हो, रवि भाई. यावर त्यांनी आपल्या अंदाजात सांगितले, ‘सुरुवातीच्या 10 षटकांत चेंडू घ्यायचा.’तेव्हा मी विचार करू लागलो की, मेलबर्न येथे पहिल्या 10 षटकात गोलंदाजी? ते म्हणाले, ‘मी जिंक्सला सांगितले आहे. यावर चेंडू फिरकी घेवू शकतो. ”
अश्विन पुढे म्हणाला, ‘मी रवि शास्त्री यांच्या सांगण्यावरून लगेच चेंडू घेतला आणि चेंडूृसुद्धा लगेच फिरकी घेवू लागला.’
महत्त्वाच्या बातम्या –
विराट ऐवजी अजिंक्य रहाणेला करा कसोटी संघाचा कर्णधार, इंग्लंडच्या दिग्गजाची मागणी
दिल्ली संघाने रिलीज केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झळकावले ‘त्याने’ शानदार शतक
ट्रिपल एच म्हणतोय, ‘…तर मी असतो दुसरा सचिन तेंडुलकर’