ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर आजपासून (४ ऑगस्ट) भारत विरुद्ध इंग्लंड या संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. ही मालिका दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ही विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामातील पहिलीच मालिका असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ आपले सर्वोत्कृष्ट खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्याच्या करण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. अशातच भारतीय संघात सलामी जोडी आणि गोलंदाजी क्रमात महत्वाचे बदल केले जाऊ शकतात.
पहिला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी मयंक अगरवाल याला गंभीर दुखापत झाली होती. ज्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. त्याच्याऐवजी केएल राहुल किंवा हनुमा विहारी या फलंदाजांना संधी देण्यात येऊ शकते. कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे की, या संघात काही महत्वाचे बदल केले जाऊ शकतात.
तसेच भारतीय संघाने जेव्हा ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यावेळी हार्दिक पंड्याने ५ गडी बाद करण्याचा किर्तीमान केला होता. त्यामुळे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण ४ वेगवान गोलंदाज मैदानात उतरवू शकतात.
माध्यमातील वृत्तांनुसार मोहम्मद सिराजला संघात स्थान दिले जाऊ शकते. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांना संधी दिली गेली होती. या ३ गोलंदाजांपैकी एका गोलंदाजाला बाहेर करून त्याला संघात स्थान दिले जाऊ शकते. किंवा आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यापैकी एका फिरकी गोलंदाजाला बाहेर करून मोहम्मद सिराजला संघात स्थान दिले जाऊ शकते. (R Ashwin or Ravindra Jadeja only one player will be part of first test against England)
तसेच सिराजला सोडून इतर कुठल्या वेगवान गोलंदाजाला संधी द्यायची असेल, तर तो शार्दुल ठाकूर असू शकतो. कारण तो आपल्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजांना माघारी धाडू शकतो आणि आवश्यकता भासल्यास तुफान फटकेबाजी देखील करू शकतो. जर शार्दुलला संधी दिली गेली तर रवींद्र जडेजाला संघाबाहेर राहावे लागु शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा रोमांच होणार द्विगुणित, ‘हे’ दिग्गज सामन्यांचे करणार समालोचन
शमीकडे कसोटी विकेट्सचा ‘द्विशतकवीर’ बनण्याची संधी, इंग्लंडचा समाचार घेत साधणार ही किमया
मॅन ऑन मिशन! सूर्यकुमार अन् पृथ्वीची इंग्लंडमध्ये ‘लँडिग’, जाणून घ्या कधीपासून सुरू करणार सराव?