आशिया चषक 2022 मधील सर्वात हाय व्होल्टेज सामना म्हणून कट्टर प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्या सामन्याकडे पाहिले जात आहे. संपूर्ण जगाचे लक्ष या सामन्याकडे लागले असून, दोन्ही संघ जिंकण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतील. त्याचवेळी पाकिस्तान संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी हा दुखापतीमुळे आशिया चषकात खेळणार नाही. मात्र, भारताचा प्रमुख फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने आफ्रिदीबाबत एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
सध्या केवळ बावीस वर्षाच्या असलेल्या शाहिनचा समावेश जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये होतो. त्याला मागील वर्षी आयसीसीचा सर्वात्कृष्ट क्रिकेटपटू हा पुरस्कार मिळाला होता. त्याच्याबद्दल बोलताना भारताचा प्रमुख फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने एक महत्त्वाचे विधान केले. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना अश्विन म्हणाला,
“मी अनेकदा विचार करतो की, जर शाहीन आफ्रिदी आयपीएल लिलावात असता तर काय झाले असते. एक उंचपुरा डावखुरा वेगवान गोलंदाज जो नवीन चेंडूने सामन्याची दिशा ठरवतो आणि डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर टाकतो. जर तो आयपीएल लिलावात असता तर कदाचित तो १४-१५ कोटींना विकला गेला असता.”
आफ्रिदी संघात नसतानाही पाकिस्तानकडे अतिशय प्रतिभावान वेगवान गोलंदाज असल्याचे देखील अश्विनने यावेळी म्हटले.
आशिया चषकातील या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही संघ विजयाने या स्पर्धेचा शुभारंभ करण्याचा प्रयत्न करतील. दहा महिन्यानंतर दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळत आहेत. यापूर्वी दुबईच्या याच मैदानावर झालेल्या टी२० विश्वचषकातील सामन्यात पाकिस्तानने भारताचा मोठा पराभव केला होता. त्या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी भारतीय संघाला या सामन्यात असेल. भारत या स्पर्धेचा गतविजेता आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘पिक्चर अभी बाकी है!’ पहिला सामना जिंकल्यानंतर अफगाणिस्तानच्या कर्णधाराचे खास संकेत
एकही रुपया न भरता लाईव्ह पाहता येणार भारत-पाकिस्तान मॅच! फक्त कराव्या लागतील ‘या’ सोप्या गोष्टी
अल्टिमेट खो खो स्पर्धेत मुंबई खिलाडीज संघाची तेलगु योद्धाजवर मात