न्यूझीलंडचे अष्टपैलू क्रिकेटपटू ऍलेन बर्गेस यांचे बुधवारी (6 जानेवारी) वृद्धपकाळाने निधन झाले. ते 100 वर्षे 250 दिवसांचे होते. त्याबरोबर ते प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेले जगातील सर्वात वयस्कर क्रिकेटपटू होते. पण आता त्यांचे निधन झाल्याने हा विक्रम भारताच्या रघूनाथ चांदोरकर यांच्या नावावर झाला आहे. रघूनाथ चांदोरकरांनी 21 नोव्हेंबर 2020 ला वयाची 100 वर्षे पूर्ण केली होती.
ब्रर्गेस यांची कारकिर्द –
बर्गेस यांचा जन्म 1 मे 1920 रोजी ख्राइस्टचर्च येथे झाला होता. ते उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करायचे. त्यांनी 1940 ते 1952 दरम्यान 14 प्रथम श्रेणी सामने खेळले होते. त्यातील 11 सामने त्यांनी कँटबरीसाठी खेळले आहेत. 14 सामन्यात त्यांनी 16 विकेट्स घेतल्या असून 466 धावा केल्या आहेत.
याशिवाय न्यूझीलंड हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार बर्गेस यांनी टँक ड्रायव्र म्हणून दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला होता. त्याचबरोबर त्याचे वडील पहिल्या महायुद्धात सहभागी होते. तसेच त्यांचे वडील क्रिकेट पंचही होते.
NZC is saddened to learn of the passing of the world’s oldest-living first-class cricketer, Alan Burgess. Alan’s daughter Pip said her father died overnight in his sleep, aged 100, at the Charles Upham Retirement Village in Rangiora.
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 5, 2021
रघुनाथ चांदोरकर आता सर्वात वयोवृद्ध क्रिकेटपटू –
महाराष्ट्रातील कर्जत येथे जन्मलेले रघुनाथ चांदोरकर आता जगातील सर्वात वयस्कर क्रिकेटपटू ठरले आहेत. रघुनाथ चांदोरकर यांनी भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारताकडून रणजी क्रिकेट सामने खेळले आहेत. चांदोरकर हे मधल्या फळीतील फलंदाज होते आणि उत्तम फिरकीपटूही होते.
सन 1943-44 आणि 1946-47 या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राकडून पाच रणजी ट्रॉफी सामने खेळले. 1950-51 च्या हंगामात ते मुंबई संघाकडून खेळले. चांदोरकर सध्या डोंबिवलीत वास्तव्यास आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 7 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यांची सर्वोच्च धावसंख्या 37 होती.
तसेच वयाची शंभरी पार करणारे ते भारताचे तिसरे प्रथम श्रेणी सामने खेळलेले क्रिकेटपटू आहेत. त्यांच्याआधी दिनकर बलवंत देवधर ( 14 जानेवारी 1892- 24 ऑगस्ट 1993) आणि वसंत नायसादराय रायजी ( 26 जानेवारी 1920 ते 13 जून 2020) या दोन रणजीपटूंनी याआधी वयाची 100 वर्षे पूर्ण केली होती.
चांदोरकर यांची गेल्या सहा वर्षांपासून प्रकृती खालावली आहे. तसेच अल्झायमर या रोगामुळे त्यांना स्मृतिभ्रंश झाला आहे. पण असे असले तरी ते अजून क्रिकेट पाहातात, असे त्यांच्या कुटुंबियांनी माहिती दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
ज्या नवदीप सैनीने सिडनीत कसोटी पदार्पण केले, त्याच्यासाठी एकवेळ भांडला होता गंभीर
… म्हणून ट्रॅविस हेडला संघात स्थान नाही, कर्णधार टीम पेनची स्पष्टोक्ती
“विराट कोहलीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणे अतिशय अवघड”