Loading...

विराट कोहलीने केले केएल राहुलबद्दल मोठे भाष्य; आता रिषभ पंतचे स्थान येणार धोक्यात?

रविवारी (19 जानेवारी) एम चिन्नास्वामी स्टेडियम (M Chinnaswamy Stadium), बेंगळुरु (Bangalore) येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात वनडे मालिकेतील अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय (Won by 7 Wickets) मिळविला.

हा सामना पार पडल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) भारताचा फलंदाज केएल राहुलची (KL Rahul) प्रशंसा केली आहे. तसेच राहुल भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून राहील असे विराटने सांगितले आहे.

यावेळी विराटने सांगितले की, ज्याप्रकारे 2003च्या विश्वचषकात राहुल द्रविडने (Rahul Dravid) यष्टीरक्षक फलंदाज म्हणून भूमिका निभावली होती, त्याचप्रकारे राहुलही भारतीय संघात संतुलन बनवेल.

“माझे असे मत आहे की, संघात खेळाडू कोणत्या क्रमांकावर खेळणार यावर अस्पष्टता असल्यामुळे आम्हाला भूतकाळात नुकसान झाले. आता आम्हाला ही गोष्ट चांगल्या प्रकारे समजली आहे. आम्ही याच क्रमाने काही काळ खेळू आणि मूल्यांकन करू की हे बरोबर आहे की चूक,” असे पत्रकारांनी चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूबद्दल विचारले असता विराट म्हणाला.

“आम्ही आता चांगली कामगिरी करत आहोत. संघात कोणताही बदल नाही. तसेच आम्ही सलग 2 सामने जिंकले आहेत. आम्ही संघात काही बदल का नाही केले असे कारण शोधू नका. हे सर्व संघाच्या चांगल्यासाठी करण्यात आले आहे,” असेही विराट यावेळी म्हणाला.

Loading...

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या सामन्यात रोहितने 119 आणि कर्णधार विराट कोहलीने 89 धावा केल्या. आणि त्याचबरोबर मालिका 2-1ने खिशात घालण्यात मोलाचे योगदान दिले.

Loading...

You might also like
Loading...