Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘जेंटलमन गेम’चे केले तीन तेरा!! लाईव्ह सामन्यात चाहरला संताप अनावर, पंचांशी भिडला; मग आपटला चष्मा

November 26, 2021
in क्रिकेट, टॉप बातम्या

भारत ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ यांच्यात ब्लूमफॉन्टेन येथे चार दिवसीय कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी राहुल चहर वादात सापडला आहे. खेळाच्या दुसऱ्या दिवशी भारत ‘अ’ संघाच्या या लेगस्पिनरने पंचाशी गैरवर्तन केले. पंचाच्या निर्णयावर राहुल चहरला राग आला आणि त्याने रागाच्या भरात आपला चष्मा फेकला. राहुल चहरच्या गैरवर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सामन्याच्या १२८ व्या षटकात राहुलचा चेंडू दक्षिण आफ्रिका अ संघाचा यष्टीरक्षक क्वेशेलेच्या पॅडला लागला तेव्हा ही घटना घडली. राहुलने जोरदार अपील केले जे पंचांनी फेटाळून लावले. पंचांनी अपील फेटाळून लावल्याने राहुल चहर चांगलाच संतापला. त्याने आधी पंचाशी वाद घातला आणि नंतर चष्मा काढून जमिनीवर फेकला.

Rahul Chahar might get pulled up here, showing absolute dissent to the umpires call.

A double appeal and throwing his equipment. #SAAvINDA

Footage credit – @SuperSportTV pic.twitter.com/TpXFqjB94y

— Fantasy Cricket Pro (@FantasycricPro) November 24, 2021

चार दिवसीय सामन्यातील पहिला डाव राहुल चहरसाठी खूपच निराशाजनक ठरला आहे. राहुल चहरने सामन्यात तब्बल १२५ धावा दिल्या आणि त्याला फक्त एकच विकेट घेण्यात यश मिळाले. एवढेच नाही तर राहुल चहरचा इकॉनॉमी रेटही प्रति षटक ४.३८ धावा इतका होता. इतर गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर नवदीप सैनी आणि अर्जन नागवासवाला यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. उमरान मलिकने एक विकेट घेतली.

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाने ५०९ धावांवर डाव घोषित केला. कर्णधार पीटर मलानने १६३ आणि टोनी डी जॉर्जीने ११७ धावा केल्या. यष्टिरक्षक क्वेशिलेने ८२ धावांचे योगदान दिले. जेसन स्मिथने ५२ आणि जॉर्ज लिंडेने ५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांनी दमदार सुरुवात केली. भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी ४ गडी गमावून ३०८ धावा केल्या. कर्णधार प्रियांक पांचाळ ९६ आणि अभिमन्यू ईश्वरनने १०३ धावा केल्या. तिसऱ्या दिवसाखेर बाबा अपराजित आणि उपेंद्र यादव नाबाद आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

भर सामन्यात फलंदाजाने हेल्मेटला मारली लाथ, लज्जास्पद कृती पाहून भडकले पंच अन् खेळाडू

गंभीरला जीवे मारण्याची धमकी देणारा मेल काश्मीर नाही, तर पाकिस्तानमधून आला; तपासातून मोठा खुलासा

राहुल-सचिनच्या नावातून पडले नाव, मुंबईकर असूनही बनला न्यूझीलंडचा हुकुमी एक्का; वाचा रचिन रवींद्रबद्दल


Next Post
Photo Courtesy: Koo/@MohammadShami

शमीने विश्रांतीवर असताना घेतला फिशिंगचा आनंद, पाहा सोशल मीडियावर शेअर केलेला खास फोटो

Photo Courtesy: Twitter/Rajasthan Royals

निकिताच्या गुगलीवर गोपाल 'क्लीनबोल्ड'; बेंगलोरमध्ये बांधली लग्नगाठ

Photo Courtesy: Instagram/ Kapil Sharma

दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासात चहर आणि ईशानला मिळाले 'सेलिब्रिटी' सहप्रवासी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143