भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचा प्रभारी प्रशिक्षक राहुल द्रविड भारतीय संघाचा कायमचा प्रशिक्षक बनणार अशी चर्चा आहे. यावर्षी ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये यूएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकानंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक रवी शास्त्रींचा कार्याकाळ संपणार आहे. त्यामुळे द्रविडला या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र आता अशी माहिती समोर येत आहे की, द्रविड भारतीय संघाचा प्रशिक्षक बनण्यासाठी इच्छुक नाही.
बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांशी याबाबत विचारल्यावर त्यांनी सांगितले की, पुढच्या प्रशिक्षकाची निवड भारतीय संघाच्या टी२० विश्वचषकातील प्रदर्शनाच्या आधारे केली जाईल. जेव्हा या पदाधिकाऱ्याला विचारण्यात आले की, रवी शास्त्रींची प्रशिक्षकपदावर कायम राहण्याची संभावना संपली आहे? किंवा ते पुढे प्रशिक्षकपदावर काम करायला इच्छुक नाहीत का? कारण, त्यांचे वय पुढच्या वर्षी ६० वर्ष होईल.
त्यावर पदाधिकारी म्हणाले की, “मला नाही वाटत की, शास्त्रींना पुढे प्रशिक्षक बनायचे नाहीये. ते नक्कीच प्रशिक्षकपदावर राहतील. पण हे सर्व संघाच्या प्रदर्शनावर अवलंबून राहील. पण द्रविड नक्कीच प्रशिक्षक पदासाठी इच्छुक नाहीये. त्याने याचे संकेत दिले आहेत की, तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुख पदावरच पुढे काम करू इच्छित आहे. बीसीसीआय त्यांच्या या निर्णयाचा सन्मान करते.” पदाधिकाऱ्याला विचारले गेले की, दुसऱ्या कोणाच्या नावावर विचार केला जात आहे का? त्यावर ते म्हणाले, “नाही, अजून कोणाच्या नावावर विचार केला गेला नाही.”
रवी शास्त्री सुरुवातीला २०१४ मध्ये संघाच्या डायरेक्टर पदावर कर्यरत झाला होते. त्यानंतर शास्त्रींना एका वर्षासाठी प्रशिक्षकपदी नियुक्त केले गेले. त्यानंतर अनिल कुंबळे भारतीय संघाचे प्रशिक्षक बनले. मात्र, विराटसोबतच्या विवादामुळे त्यांनी २०१७ च्या चॅम्पियन्स ट्राॅफीनंतर त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शास्त्री पुन्हा प्रशिक्षक बनले आणि २०१९ विश्वचषकापर्यंत त्यांचा कर्यकाळ पुर्ण केला. भारतीय संघाच्या चांगल्या प्रदर्शनामुळे पुढे त्यांचा कार्यकाळ २०२० च्या टी२० विश्वचषकापर्यंत वाढविण्यात आला. मागच्या वर्षी भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विश्वचषक होऊ शकले नाही. यावर्षी विश्वचषकाचे आयोजन दुबई आणि ओमानमध्ये केले गेले आहे.
बीसीसीआय शास्त्रींचा कार्यकाळ संपल्यानंतर द्रविडला भारतीय संघाचा प्रशिक्षक बनवण्याच्या विचारात होते. मात्र, द्रविडला एनसीएच्या प्रमुखपदावर कायम राहायचे आहे. नुकताच द्रविडचा एनसीए प्रमुखपदाचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर निवड प्रक्रिया पुन्हा केली गेली. राहुल द्रविडने एनसीए प्रमुख पदासाठी पुन्हा अर्ज केला आहे. या पदासाठी त्याच्याव्यातिरिक्त कोणत्याच मोठ्या नावाने अर्ज केलेला नाही. यामुळे त्याची या पदावर पुन्हा नियुक्ती होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटसेना अजून बळकट! दुखापतीवर मात करत ‘या’ खेळाडूचे पुनरागमन, रहाणेने दिली माहिती
अमेरिकेच्या धरतीवर पहिले अर्धशतक! उन्मुक्त चंदने शेअर केला ताबडतोड फलंदाजीचा व्हिडिओ