भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकतीच चार कसोटी सामन्याची बॉर्डर- गावसकर मालिका पार पडली. ॲडलेड येथे पराभव पत्करावा लागल्यानंतरही भारतीय संघाने मालिकेत जबरदस्त पुनरागमन करत 2-1 ने विजय मिळवला. भारताच्या या ऐतिहासिक मालिका विजयात युवा खेळाडूंनी विशेष महत्वाची भूमिका बजावली.
प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे शुभमन गिल, मोहम्मद सिराज, वाॅशिंग्टन सुंदर यांसारख्या खेळाडूंना सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. या सर्वच खेळाडूंनी आपल्या निवडीला सार्थ ठरवत उत्तम कामगिरी केली.
युवा खेळाडूंच्या या कामगिरीबद्दल सर्व क्रिकेट वर्तुळातून राहूल द्रविड यांची स्तुती होत आहे. द्रविड हे मागील काही काळापासून भारताच्या १९ वर्षाखालील संघाचे तसेच भारत ‘अ’ संघाचे प्रशिक्षक असल्याने, हे सर्व युवा खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनातूनच पुढे आलेले आहे. मात्र याबाबतीत द्रविड यांनी चकित करणारी प्रतिक्रिया दिली आहे.
द्रविड यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत खेळाडूंच्या यशाचे श्रेय नम्रपणे नाकारले आहे. द्रविड इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत स्मित हास्य करत म्हणाले, “काहीही कारण नसताना हे श्रेय मिळत आहे. मुलांनी उत्तम कामगिरी केली.” द्रविड यांनी जरी युवा खेळाडूंच्या यशाचे श्रेय घेण्यास नकार दिला असला तरी, या सर्व युवा खेळाडूंनी अनेक वेळा द्रविड यांचे आभार मानलेले आहेत.
माजी निवडकर्ते जतिन परांजपे यांनीदेखील द्रविड यांचे कौतुक केले आहे. परांजपे म्हणाले, “द्रविड यांनी युवा खेळाडूंना काही विशेष मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे निश्चितच खेळाडूंना मदत झाली. द्रविड यांच्या सान्निध्यात राहिल्याने खेळाडूंचे प्राथमिक क्रिकेट सुधारले व पुढे ते रवी शास्त्रींसारख्या दिग्गजाकडे गेल्याने त्यांना आणखीनच फायदा झाला.”
महत्त्वाच्या बातम्या-
क्या से क्या हो गया! दहा दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणारा टीम पेन झाला वॉटर बॉय