नवी दिल्ली। आयपीएल २०२० मध्ये फ्रँचायझी राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी ३ सामन्यात विजय मिळवला आहे, तर उर्वरित ४ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. जिंकलेल्या ३ सामन्यात अष्टपैलू राहुल तेवतियाने शानदार कामगिरी केली आहे. अशाप्रकारे तो राजस्थान संघाच्या विजयाचे कारण ठरला आहे. जर आकडेवारी पाहायची झाली, तर तेवतियाच्या कामगिरीच्या जोरावरच संघाने विजय मिळवला आहे. तरीही, त्याला एक बक्षीस मिळवण्यासाठी तब्बल ६ वर्षे लागली आहेत.
खरं तर तेवतियाने २०१४ साली राजस्थानकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ६ वर्षांनी म्हणजेच २०२० च्या हंगामात त्याला त्याचा पहिला वहिला ‘सामनावीर’ पुरस्कार मिळाला आहे. रविवारी (११ ऑक्टोबर) हैदराबाद संघाविरुद्ध २८ चेंडूंचा सामना करत नाबाद ४५ धावांची तडाखेबंद खेळी केल्यामुळे त्याला हा पुरस्कार मिळाला. तरीही, मागील काही वर्षांमध्ये त्याने खूप कमी सामने खेळले होते. परंतु सध्या तो राजस्थान संघासाठी अष्टपैलू भूमिका निभावत आहे.
आयपीएलमध्ये तीन संघांकडून खेळला आहे
आयपीएलच्या इतिहासात तेवतिया राजस्थान रॉयल्स, किंग्स इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग राहिला आहे. त्याने आतापर्यंत २७ सामने खेळले आहेत. परंतु पहिल्यांदाच त्याला आयपीएलमध्ये सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. आश्चर्याची बाब अशी की, ज्या सामन्यात तेवतियाने चांगली कामगिरी केली आहे. त्या सामन्यात राजस्थान संघाला विजय मिळाला आहे. उर्वरित सामन्यात संघाला पराभव स्विकारावा लागला आहे.
तेवतियाचा जन्म हरियाणाच्या सिहीमध्ये झाला आहे. राजस्थानचा पहिला विजय चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मिळवला होता. राजस्थानने शारजाहच्या मैदानावर चेन्नईला १६ धावांनी पराभूत केले होते. त्या सामन्यात तेवतियाने ८ चेंडूत १० धावा केल्या होत्या, तर गोलंदाजीत त्याने ४ षटके टाकत ३७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या विकेट्समध्ये धडाकेबाज फलंदाज शेन वॉटसनचा समावेश होता.
राजस्थानच्या विजयाचा हीरो
किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध राजस्थान संघ २२४ धावांच्या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करत होता. त्यावेळी तेवतियाने त्या सामन्यात एका षटकात त्याने ५ षटकार ठोकले होते. यादरम्यान त्याने ३१ चेंडूत ५३ धावांची खेळी केली होती आणि राजस्थानला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘मला स्वत: वर विश्वास होता…’, हैदराबादविरुद्ध विजय मिळवल्यानंतर तेवतियाने दिली प्रतिक्रिया
-Video : ‘या’ भारतीय खेळाडूच्या डान्स स्टाईलपुढे ब्रावो-गेलदेखील पडतील फिके
-तेवतिया आणि राजस्थान संघाच नातं आहे खूपच खास, असं आम्ही नाही आकडेवारी सांगतेय
ट्रेंडिंग लेख-
-‘मिड सीजन ट्रान्सफर’चा फायदा घेत चेन्नई ‘या’ ३ खेळाडूंना घेणार का आपल्या संघात?
-“मिड सीझन ट्रान्सफर” नियमामुळे ‘हे’ ४ भारतीय करु शकतात आयपीएलमध्ये कमबॅक
-विरोधी संघ खुश..! आयपीएल २०२०मध्ये बिघडला या ३ स्टार खेळाडूंचा फॉर्म