इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला ९ एप्रिलला सुरुवात होणार आहे. या हंगामासाठी सर्व संघांचे खेळाडू आपापल्या संघात दाखल होत आहेत. तसेच अनेक खेळाडू सध्या ७ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहेत. यात राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू राहुल तेवातियाचाही समावेश आहे. या क्वारंटाईनच्या कालावधीतील तेवतियाचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या ट्विटर अकाउंट वर शेअर केला आहे.
राहुल सध्या हॉटेलमध्ये राहून आपला क्वारंटाईन काळ पूर्ण करीत आहे. या व्हिडिओमध्ये तो आपल्या खोलीत काय काय करत आहे या संबधित संपूर्ण माहिती दाखवली आहे. त्याचा हा व्हिडिओ रेकॉर्ड होत होता तेव्हा त्याला कॅमेरा चालू आहे याची कल्पना पण नव्हती.
राजस्थान रॉयल्सनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल आपल्या खोलीत वेळ घालवण्यासाठी प्रथम फोनवर बोलताना, त्यानंतर तो व्यायाम करतानाही दिसत आहे. याशिवाय तो फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच चाहत्यांनाही हा व्हिडिओ खूप आवडला आहे. राजस्थान रॉयल्सने हा व्हिडिओ शेअर करत खाली लिहिले आहे की, “राहुलला वाटते की कोणीही त्याला पाहात नाहीये.”
Rahul thought no one was watching. ????#HallaBol | #RoyalsFamily | @rahultewatia02 pic.twitter.com/kGdrbMLPvP
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 31, 2021
त्याच्या आयपीएल कामगीरीबद्दल सांगायचे म्हटले तर, मागील हंगामात त्याने चमकदार कामगिरी केली होती. आता पुन्हा एकदा त्याने अशीच कामगीरी करावी अशी राजस्थान संघाकडून अपेक्षा आहे. आयपीएल 2020मध्ये त्याने 14 सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये त्याने 255 धावा केल्या आहेत, त्याशिवाय त्याने आयपीएलमध्ये 10 बळी घेतले आहेत.
आयपीएल 2021 मध्ये राजस्थान रॉयल्स संघ आपला पहिला सामना 12 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2021: एबी डिव्हिलियर्स पाठोपाठ ‘कॅप्टन’ कोहली चेन्नईत दाखल, पाहा फोटो