आयपीएलमध्ये बुधवारी (7 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केले. या सामन्यात कोलकाताचा सलामीवीर राहुल त्रिपाठीने उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने 51 चेंडूत 81 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळेच कोलकाता संघ आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला आणि धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा पराभव केला. राहूलच्या या खेळीने धोनीच्या संघाला धूळ चारली असली तरी राहुलचे धोनीशी खास नाते आहे.
एका वृत्तपत्राशी बोलताना राहुलचे वडील अजय म्हणाले की, “राहुलच्या मनात धोनीबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे. धोनीच्या संघाविरुद्ध राहुलने खेळलेला डाव खूप खास आहे कारण माझा मुलगा रांचीमध्ये जन्मला होता आणि राहुलची आई सरोज धोनीच्या शहरातील असून तिचे आई-वडील धोनीच्या घराजवळच राहतात.”
पुढे बोलताना ते म्हणाले की, “दोघेही पुणे संघातून खेळत असताना मी प्रथमच एमएस धोनीला भेटलो. धोनी एक नम्र व्यक्ती आहे. राहुलचे क्रिकेटवर खूप प्रेम आहे. वयाच्या दुसऱ्या वर्षापासून तो क्रिकेट खेळत आहे.”
“लहानपणी गंगटोकमध्ये शिकत असताना राहुलने खोडरबरचा चेंडू म्हणून वापर केला आणि पेन्सिलचा स्टंप म्हणून वापर केला. त्याने क्रिकेट सोडून इतर कोणताही खेळ खेळला नाही आणि त्याने संगणक विज्ञानमध्ये पदवी संपादन केली आहे. त्याने आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळताना अधिक सामने जिंकवून भारताकडून खेळावे अशी आमची इच्छा आहे.” असेही पुढे बोलताना त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
हा तर सेम ‘गजनी लुक’! एमएस धोनीच्या नव्या लुकला पाहून तुम्हीही असंच म्हणालं
गेम आहे मिलीमीटर! फक्त काही इंचांनी हुकला मॅक्सवेलचा षटकार नाहीतर…
Video: गिल-राणाची बालिश चूक! दोन्ही फलंदाज धावले क्रिजच्या एकाच बाजूला आणि…
ट्रेंडिंग लेख-
फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा
आयपीएल २०२० : ‘या’ तीन संघांचे प्ले-ऑफमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित
आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ