भारतीय संघाला वेस्ट इंडीज दौरा संपल्यानंतर झिम्बाब्वे दौरा करायचा आहे. झिम्बाब्वेविरुद्ध खेळली जाणारी तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका १८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. शिखर धवन या दौऱ्यात भारताचे नेतृत्व करणार असून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती दिली गेली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या या मालिकेत एका ३१ वर्षीय खेळाडूला भारतीय संघात सहभागी केले गेले आहे, जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो.
जिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेत भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. अशात संघात ३१ वर्षीय फलंदाज राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) याला सहभागी केले गेले आहे. त्रिपाठीला भारतीय संघासाठी अद्याप एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाहीये. मात्र, जिम्बाब्वे दौऱ्यात त्याची आंतरराष्ट्रीय पदार्पणाची प्रतिक्षा संपू शकते. त्रिपाठी त्याच्या ताबडतोड फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत तो स्वतःची गुववत्ता दाखवेल, अशी अपेक्षा आहे.
आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातही नाही मिळाली संधी –
तत्पूर्वी भारताच्या इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यातही त्रिपाठीला संघात निवडले गेले होते, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये मात्र त्याला संधी दिली गेली नव्हती. आयर्लंडविरुद्धच्या संपूर्ण टी-२० मालिकेत तो संघासोबत होता, तर इंग्लंडविरुद्धच्या फक्त एकाच टी-२० सामन्यासाठी त्याला संघात निवडले गेले होते.
आयपीएल २०२२ मध्येही राहुल त्रिपाठीने जबरदस्त प्रदर्शन केले होते. सनरायझर्स हैदराबात संघासाठी त्याचे योगदान अत्यंत महत्वाचे ठरले होते. तो स्वतःच्या संघासाठी सलामीवीर, तसेच फिनिशरची भूमिका देखील चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो. त्याने आजपर्यंत एकूण ७६ आयपीएल सामने खेळले आहेत आणि यामध्ये १७९८ धावांची नोंद स्वतःच्या नावापुढे केली आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडलेला भारतीय संघ –
शिखर धवन (कप्तान), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, ईशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
CWG Breaking: अवघ्या १९ व्या वर्षी जेरेमीने रचला इतिहास! जिंकले कॉमनवेल्थ गोल्ड
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडकर्त्यांनी ‘या’ ३ भारतीय खेळाडूंवर केले दुर्लक्ष, सैनीचाही समावेश