रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन तसेच श्री गणेश ग्रामस्थ मंडळ व भालचंद्र स्पोर्ट्स बोकडविरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रौढ गट पुरुष व महिला रायगड जिल्हा निवड चाचणी व अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा २०१९ चे आयोजन करण्यात आलं आहे.
उरण तालुक्यातील बोकडविरा येथे दिनांक ५ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०१९ या कालावधीत स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत तब्बल २५६ पुरुष संघ तर ३२ महिला संघ सहभागी होणार आहेत. राज्यात प्रौढ गटात रायगड जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत सर्वात जास्त संघ सहभागी होणार आहेत.
रायगड जिल्ह्याचा विस्तार बघता या गटात अधिक संघ सहभागी झाले आहेत. अलिबाग, पेन, उरण पनवेल, कर्जत, सुधागड आदी तालुक्यातील मातब्बर कबड्डी संघ सहभागी होणार आहेत.
पुरुष व महिला निवड चाचणीतून रायगड जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे. चिपळूण-रत्नागिरी येथे होणाऱ्या वरीष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत निवडलेला संघ रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल. यासाठी तब्बल ३४५८ खेळाडू यास्पर्धेत सहभागी होत असून ६ क्रीडांगणे तयार करण्यात येणार आहेत. तसेच १०० पंच स्पर्धा पार पडण्याचे काम बघणार आहेत.
बीड जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा संपन्नhttps://t.co/baLpceaSup#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi #Kabaddi #KhelKabaddi
— Maha Sports (@Maha_Sports) December 2, 2019
मम्मीज फाउंडेशन जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत संघर्ष क्रीडा मंडळ व सत्यम सेवा संघांची बाजी. https://t.co/HTlcEIqTQc#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi #Kabaddi #KhelKabaddi
— Maha Sports (@Maha_Sports) December 2, 2019