पुणे (8 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये सलग तीन पराभवाचा सामना केलेले रायगड व जालना हे दोन संघ आज एकमेकांना विरुद्ध खेळत असल्याने कोणत्या तरी एका संघाला विजयचा खात उघडण्याची संधी होती. रायगडच्या प्रशांत जाधव ने आक्रमक खेळ करत सुरुवातीलाच गुण मिळवले काही मिनिटातच जालना संघाला ऑल आऊट करत रायगड संघाने आघाडी मिळवली. बदली खेळाडू आलेल्या निखिल शिर्के ने सुद्धा चांगले गुण मिळवले.
मध्यंतरापूर्वी प्रशांत जाधव ने सुपर टेन पूर्ण करत आपल्या संघाला 30-08 अशी आघाडी मिळवून दिली होती. जालना कडून केवळ युवराज राठोड ने चांगल्या खेळाचा प्रदर्शन केला. मध्यंतरा नंतर खेळ सुरू झाल्यानंतर निखिल शिर्के सुद्धा आपला सुपर टेन पूर्ण करत संघाचा विजय जवळपास निश्चित केला. बचवाफळीत राज मोरे व हृतिक रटाटे यांनी चांगल्या पकडी करत विरुद्ध संघाला सामन्यात येण्याची संधी दिली.
रायगड संघाने या स्पर्धेत एका सामन्यांत 50 पेक्षा जास्त गुण मिळवण्याचा रेकॉर्ड केला. रायगड संघाने 70-18 असा तब्बल 52 गुणांच्या फरकाने जालना संघाचा पराभव करत स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. या स्पर्धेत एका सामन्यात चढाईत सर्वाधिक 19 गुण मिळवत निखिल शिर्के ने महत्वपूर्ण भूमिका निभावली. तर प्रशांत जाधव सुद्धा चढाईत 17 गुण मिळवत आपला उत्कृष्ट प्रदर्शन केला
बेस्ट रेडर- निखिल शिर्के, रायगड
बेस्ट डिफेंडर- राज मोरे, रायगड
कबड्डी का कमाल- निखिल शिर्के, रायगड