काही दिवसांपासून अनेकांच्या विवाहाच्या बातम्या समोर येत आहेत. यामध्ये क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज खेळाडूंचाही समावेश आहे. आता या यादीत अजून एका भारतीय खेळाडूचा समावेश झाला आहे. आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू गोलंदाज राहुल तेवतियाने देखील आता आयुष्यातील नवीन इनिंगला सुरुवात केली आहे. राहुल सोमवारी (२९ नोव्हेंबर) विवाह बंधनात अडकला आहे. राहुलने रिद्धि पन्नूसोबत विवाह केला असून आयुष्यातील नवीन पर्वाची सुरुवात केली आहे. तत्पूर्वी राहुल आणि रिद्धि यांनी याच वर्षाच्या सुरुवातीला साखरपुडा केला होता.
राहुल आणि रिद्धिने याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा केला होता आणि आता दोघांनी एकमेकांसोबत लग्नाची गाठ बांधली आहे. फेब्रुवारी महिन्यातच जेव्हा त्यांचा साखरपुडा पार पडला होता, त्यानंतर या दोघांचे फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाले होते. आता सोमवारी दोघांनी विवाह केल्यानंतर देखील सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची चर्चा होत आहे आणि फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Shaadi mubarak ho, Mr. & Mrs. Tewatia! ????#RoyalsFamily | @rahultewatia02 pic.twitter.com/6lB9CinsVv
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) November 30, 2021
राहुलच्या लग्नासाठी क्रिकेटविश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये रिषभ पंत, नितीन राणा आणि युजवेंद्र चहल यांचा देखील समावेल होता. चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राहुलला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, राहुलने मागच्या वर्षी आयपीएल मागच्या हंगामात जबरदस्त प्रदर्शन केले आणि त्यानंतर त्याला भारतीय संघात सामील केले गेले होते, पण त्याला मैदानावर खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने २०१४ मध्ये पहिल्यांदा आयपीएलमध्ये पदार्पण केले होते, पण त्याला पहिल्यांदा प्रसिद्धी तेव्हा मिळाली, जेव्हा आयपीएल २०२० मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध सामन्यात एका षटकात ५ षटकार मारले होते. त्याने हे पाच षटकार २७ सप्टेंबर २०२० रोजी वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज शेल्टन कॉट्रेलला मारले होते.
राहुल तेवतियाचा जन्म फरीदाबादमध्ये झाला. तो एक अष्टपैलू गोलंदाज असून आयपीएल फ्रेंचायझी राजस्थान रॉयल्ससाठी त्याने अनेकदा महत्वाची खेळी करून दाखवली आहे. तसेच तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरियाणा संघासाठी खेळतो. त्याने त्याने प्रथम श्रेणी पदार्पण २०१३-१४ रणजी ट्रॉफी हंगामातून केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
कपिल देवच्या नेतृत्त्वाखालील विश्वचषक विजयाचा प्रवास येणार सर्वांसमोर; ‘८३’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
Video: शार्दुल ठाकूरच्या साखरपुड्याला हिटमॅनची हजेरी, अनोख्या अंदाजात रोहितकडून मित्राला शुभेच्छा
कधी आणि कुठे पाहू शकाल आयपीएल २०२२ रिटेंशन प्रक्रिया? जाणून घ्या एका क्लिकवर