इंडियन प्रीमीयर लीगमधील सर्व संघ १४ व्या हंगामासाठी जोरदार तयारीला लागले आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी सर्व संघांनी त्यांच्या संघात कामय केलेल्या आणि मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आता पहिल्या आयपीएल हंगामाचे विजेतेपद मिळवलेल्या राजस्थान रॉयल्सने श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू कुमार संगकाराकडे एक नवी जबाबदारी सोपवली आहे.
राजस्थानने संगकाराला आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी त्यांचा क्रिकेट संचालक म्हणून नियुक्त केले आहे. सध्या मेरिलबन क्रिकेट क्लबचा अध्यक्ष असलेला संगकारा आता राजस्थान रॉयल्स संघाच्या प्रशिक्षक संरचना, संघाच्या योजना, प्रतिभाशाली खेळाडू शोधणे अशा जबाबदाऱ्या सांभाळेल, तसेच नागपूरमध्ये असलेल्या रॉयल्स ऍकेडमीमध्ये देखील सुत्रे सांभाळेल.
Adding some ???????????????????????????????????? to the #RoyalsFamily. ????#WelcomeSanga | #HallaBol | @KumarSanga2 pic.twitter.com/4zREps1PlW
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) January 24, 2021
स्टिव्ह स्मिथ संघातून बाहेर, तर संजू सॅमसन कर्णधार
मागील हंगामात गुणतालिकेत शेवटच्या स्थानी असलेल्या राजस्थान संघाला यंदा चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा असेल, त्याचमुळे कदाचीत त्यांनी यंदाच्या आयपीएल हंगामासाठी काही मोठे निर्णय घेतले आहेत. संगकाराला संचालक करण्याआधी राजस्थानने त्यांचा कर्णधार स्टिव्ह स्मिथला संघातून मुक्त केले आहे. त्याच्याऐवजी संजू सॅमसनकडे नेतृत्वाची सुत्रे दिली आहेत. त्यामुळे यंदाच्या १४ व्या आयपीएल हंगामात संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
संगकाराच्या नियुक्तीबद्दल कर्णधार सॅमसन म्हणाला…
संगकाराला राजस्थान रॉयल्सने क्रिकेट संचालक म्हणून नियुक्त केल्यानंतर सॅमसन म्हणाला, ‘सर्वकालिक दिग्गज यष्टीरक्षक संघाशी जोडला गेल्याने मस्त वाटत आहे. त्याने अनेक सामने खेळले असून तो एक दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज आहे. तो मैदानात किंवा मैदानाबाहेरही एक उत्कृष्ट व्यक्ती आहे. त्याच्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहे.’
संगकाराचा अनुभव –
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८ हजारांहून अधिक धावा करणाऱ्या संगकाराला आयपीएलचाही चांगला अनुभव आहे. त्याने सनरायझर्सचे नेतृत्वही केले आहे. तसेच तो डेक्कन चार्जर्स संघाचाही कर्णधार होता. याबरोबरच त्याने पहिल्या ४ हंगामात प्रत्येकी ३०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याने २००८ ते २०१३ पर्यंत आयपीएलमध्ये खेळताना ७१ सामन्यात २५.९५ च्या सरासरीने १६८७ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आऊट, आऊट..! अप्रतिम झेल पकडल्यानंतर पठ्ठ्यानं ‘असा’ साजरा केला आनंद, पाहा व्हिडिओ
एक मॅच होऊन जाऊ द्या! डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार ट्रिपल एचचे टीम इंडियाला चॅलेंज
आठवण मोहिंदर अमरनाथ यांनी सहा टाके घातल्यानंतरही केलेल्या ‘त्या’ झुंजार खेळीची