पंधराव्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) हंगामातील पहिला क्वालिफायर सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. हा सामना २४मे रोजी इडन गार्डन, कोलकाता येथे खेळला जाणार आहे. यासाठी राजस्थानचा संघ कोलकाता येथे पोहोचला आहे. पण, यावेळी कोलकाताच्या खराब हवामानाचा वाईट अनुभव राजस्थान संघाला आला आहे.
राजस्थान संघाच्या (Rajasthan Royals) फ्लाईटने जेव्हा कोलकाताच्या दिशेने उड्डाण घेतले, तेव्हा त्यांना खराब वातावरणाचा (weather turbulence) सामना करावा लागला. या भयानक घटनेचा व्हिडीओ संघाने त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर पोस्ट केला आहे. या गंभीर संकटामधून संघसहकारी थोडक्यात वाचले असनू कोणत्याही व्यक्तीला इजा झाली नाही.
आयपीएलच्या या हंगामात राजस्थानने १४ सामने खेळले असून त्यातील ९ सामने जिंकले आहे. यामुळे संघाने गुणतालिकेत दुसरे स्थान काबीज केले आहे. तसेच ते जरी गुजरात विरुद्ध होणाऱ्या क्वालिफायर सामन्यात पराभूत झाले, तरी त्यांना अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी अजून एक संधी असेल.
🛫 Based on a true experience! 😂#RoyalsFamily | #HallaBol pic.twitter.com/p5KSFH09CB
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 22, 2022
या आयपीएलच्या हंगामात (IPL 2022) राजस्थानने सांघिक कामगिरी करत चाहत्यांना खूष केले आहे. तसेच ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप या दोन्हीमध्ये राजस्थानचेच वर्चस्व आहे. जॉस बटलरने १४ सामन्यांत ४८.३८च्या सरासरीने ६२९ धावा आणि युजवेंद्र चहलने १४ सामन्यांत २६ विकेट्स घेत अनुक्रमे ऑरेंज आणि पर्पल कॅप्स परिधान केली आहे.
तसेच २००८ नंतर पुन्हा एकदा आयपीएलचा किताब मिळवण्याची मोठी संधी राजस्थानकडे आहे. यामुळे संघाचा पुढील सामने जिंकण्यावर भर असेल.
राजस्थानचा संघ पुढीलप्रमाणे- संजू सॅमसन (कर्णधार, यष्टीरक्षक), जॉस बटलर, देवदत्त पडिक्कल, रस्सी वॅन डर ड्यूसेन, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जेम्स नीशम, नवदीप सैनी, कोर्बिन बॉश, करुण नायर, केसी करियप्पा, डेरिल मिशेल, ओबेड मॅकॉय, यशस्वी जयसवाल, तेजस बरोका, अनुनय सिंह, ध्रुव जुरैल, शुभम गढवाल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
धवनचा ‘गब्बर’ विक्रम, आयपीएलमध्ये असा किर्तीमान करणारा बनला जगातील पहिलाच फलंदाज
पंजाबचा ‘उडता’ लिव्हिंगस्टोन! बाउंड्री लाईनवर हवेत झेपावत अष्टपैलूने घेतला जबरदस्त झेल
‘क्रिकेट इथेच संपत नाही, मला फॉर्ममध्ये येण्यासाठी…’ आयपीएलमधील खराब कामगिरीबद्दल रोहितचे मोठे भाष्य