पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकातून भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी भारतीय संघात पुनरागमन करेल, अशी सर्वांना आशा होती. पण, शनिवारी (१५ ऑगस्ट) अचानक धोनीने सोशल मीडियाद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे सोशल मीडियावर सर्वत्र धोनीचीच चर्चा होत आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींनी सोशल मीडियावरुन धोनीला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अशात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बीसीसीआयकडे धोनीला निवृत्तीचा सामना खेळू देण्याची मागणी केली आहे. परंतु, आयपीएलचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले आहे की, धोनीला निवृत्तीला सामना खेळायला मिळणार नाही. Rajiv Shukla Said That MS Dhoni Never Expressed Any Will To BCCI For Farewell Match
मीडियाशी बोलताना शुक्ला म्हणाले की, “धोनीचा निवृत्तीचा सामना आोयजित करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. कारण, धोनीने बीसीसीआयकडे निवृत्ती सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही.”
तसं तर, धोनी नेहमी क्रिकेटचा विचार करत असतो. तो मैदानावर असो किंवा मैदानाबाहेर नेहमी क्रिकेटवर आपले लक्ष केंद्रित करण्याच्या विचारात असतो. पण जुलै २०१९मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर धोनीने स्वत:ला आपली पत्नी साक्षी आणि मुलगी झिवामध्ये व्यस्त केले होते. त्यातही लॉकडाऊनमध्ये त्याला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची जास्त संधी मिळाली.
पण, जवळपास १ वर्ष झाले क्रिकेटपासून दूर असलेला धोनी १९ सप्टेंबरपासून युएईत सुरु होणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात खेळताना दिसणार आहे. आयपीएलच्या तयारीसाठी तो चेन्नईला पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीच्या निवृत्तीने शोएब अख्तर झाला भावूक; व्हिडिओ शेअर करत म्हणाला…
निवृत्तीबाबत रैनाचे संपूर्ण स्टेटमेंट आले समोर; वाचा- काय काय म्हणालाय
निवृत्ती घेतल्यानंतर धोनी पहिल्यांदाच घेणार हातात बॅट, या दिवशी खेळणार पहिली मॅच
ट्रेंडिंग लेख –
कोरोनामुळे निधन झालेल्या भारताच्या पहिल्या ‘वॉल’ बद्दल फारशा माहिती नसलेल्या १० गोष्टी
लॉकडाऊनमध्ये ‘या’ ३ भारतीय खेळाडूंना मिळाल्या त्यांच्या जीवनसंगिनी
धोनी- रैनाप्रमाणे फेअरवेलची मॅच न खेळताच क्रिकेटला राम राम ठोकणारे ५ भारतीय दिग्गज