आयपीएल २०२०ची सुरुवात होण्यासाठी आता जवळपास १ महिना उरला आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान युएईत खेळण्यात येणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी खेळाडूंबरोबर चाहतेदेखील खूप उत्सुक आहेत. सोशल मीडियावर चाहते आयपीएलचे वेगवेगळे मिम्स बनवून शेअर करत आहेत.
अशात, राजस्थान रॉयल्सच्या एका चाहत्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत विराटने राजस्थान संघाची जर्सी घातलेली दिसत आहे. चाहत्याने हा फोटो शेअर करत राजस्थान रॉयल्सला टॅग केला आहे आणि त्यांना विचारले आहे की, “त्यांना विराटला त्यांच्या संघात सामाविष्ट करायला आवडेल का?” Rajsthan Royals Would Include Virat Kohli In Their Team On One Condition
Only if @NagsMr comes along too. 🙃 https://t.co/ywmIgoaoGe pic.twitter.com/gLd9PnU3LG
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) August 9, 2020
त्या फोटोवर राजस्थान रॉयल्सने कमेंट करत म्हटले आहे की, “केवळ एका अटीवर. जेव्हा विराटसोबत मिस्टर नॅग्सदेखील आमच्या संघात सामाविष्ट होतील.” मिस्टर नॅग्स हे आरसीबीचे बॅकरुम स्टाफ कर्मचारी आहेत. ते नेहमी आरसीबीच्या खेळाडूंसोबत मजा-मस्ती करताना दिसतात. जेव्हाही आयपीएल सुरु होते, तेव्हा मिस्टर नॅग्स आरसीबीचे पोस्टर बॉय बनतात.
विराटच्या नेतृत्त्वाखालील आरसीबीने आयपीएलच्या १२ हंगामात एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाही. यापुर्वी तीनवेळा आरसीबीने आयपीएलच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली आहे. परंतु, त्यांच्या वाट्याला अपयश आले आहे. त्यामुळे आयपीएल २०२०मध्ये ट्रॉफी जिंकत आरसीबी नवा इतिहास रचू शकते.
राजस्थान रॉयल्सविषयी बोलायचे झाले तर, त्यांनी आयपीएलच्या पहिल्या हंगामात अंतिम सामन्यात (२००८) चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत ट्रॉफी पटकावली होती. आयपीएल २०२० मध्ये स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान रॉयल्स संघ कशाप्रकारे प्रदर्शन करेल हे पाहणे रोमांचक ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या –
काहीही होऊ द्या! या वर्षापर्यंत धोनीचं राहाणार सीएसकेचा कर्णधार
क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर मॅच खेळणारा आयपीएलमधील एकमेव संघ, कारण होते…
ऍडम गिलख्रिस्टने अखेर मान्य केलेच, भारताच्या ‘या’ दोघांनी आम्हाला फारच त्रास दिला
ट्रेंडिंग लेख –
२ वेळा विश्वचषकात संधी मिळूनही दुखापतीमुळे खेळू न शकलेली हरहुन्नरी पुणेकर देविका वैद्य
सीपीएल २०२०: ४ परदेशी खेळाडू जे बनू शकतात सीपीएलच्या आठव्या हंगामाचे स्टार
कसोटीत खेळताना जगभर धुमाकूळ घालणारे भारताचे सर्वात यशस्वी ५ गोलंदाज