वेस्ट इंडीज येथे १९ वर्षाखालील मुलांचा क्रिकेट विश्वचषक (U19 World Cup 2022 West Indies) खेळला जात आहे. या स्पर्धेत भारतीय संघ आपल्या चमकदार खेळ आणि सर्वांची मने जिंकताना दिसतोय. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत आयर्लंड संघावर भारतीय संघाने मोठा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. भारताच्या या विजयात महाराष्ट्राचा युवा अष्टपैलू राजवर्धन हंगारगेकर (Rajwardhan Hangargekar) याने धडाकेबाज फलंदाजी करत सर्वांची मने जिंकली.
Rajvardhan Hangargekar smashing three consecutive sixes is the winner of the @Nissan #POTD from the #U19CWC clash between India and Ireland 👏 pic.twitter.com/texqEd4gZy
— ICC (@ICC) January 20, 2022
भारतीय संघाने मिळवला मोठा विजय
नियमित कर्णधार यश धूल व इतर पाच प्रमुख खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह (India U19 Players Corona Positive) आढळल्याने भारतीय संघाला आयर्लंड विरुद्ध उपलब्ध ११ खेळाडूं सोबतच खेळावे लागले. तरीही भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३०७ धावा धावफलकावर लावल्या होत्या. त्यानंतर, गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत आयर्लंडचा डाव १३३ धावांवर गुंडाळला. भारतीय संघाने १७४ धावांनी मोठा विजय साजरा केला. या सामन्यात शानदार शतकी खेळी करणाऱ्या हरनूर सिंग (Harnoor Singh) याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भारताचा अखेरचा साखळी सामना युगांडा विरुद्ध होईल.
https://www.instagram.com/icc/tv/CY7Wb2Ll2GB/?utm_medium=copy_link
https://www.instagram.com/icc/tv/CY7Wb2Ll2GB/?utm_medium=copy_link
राजवर्धनची स्फोटक फलंदाजी
संपूर्ण भारतीय संघाने या सामन्यात दमदार कामगिरी केली असली तरी, अष्टपैलू राजवर्धन हंगारगेकर याने सर्वांची मने जिंकली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या वेगवान गोलंदाजीने प्रभावित करणाऱ्या राजवर्धनने दुसऱ्या सामन्यात आपल्या फलंदाजीची कमाल दाखवली. (Rajwardhan Hangargekar Sixes)
या सामन्यात ४५ व्या षटकात फलंदाजीसाठी आलेल्या राजवर्धनने आपल्या तुफानी खेळीने आयर्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. काहीशी धिमी सुरुवात केल्यानंतर त्याने अखेरच्या दोन षटकात धावांचा वेग वाढवला. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत १७ चेंडूंमध्ये नाबाद ३९ धावा तडकवल्या. यामध्ये १ चौकार व ५ षटकारांचा समावेश होता. त्याने अखेर चार चेंडूंवर ६,६,६,४ अशा २२ धावा वसूल करून संघाला ३०७ पर्यंत मजल मारून दिली. त्याच्या या फलंदाजीचा व्हिडिओ आयसीसीने ट्विट केला आहे.
आपल्या १४५ किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी करणार्या राजवर्धनने आपली गोलंदाजाची भूमिका देखील या सामन्यात उत्कृष्टरित्या पार पाडली. त्याने ७ षटकात १७ धावा देऊन एक गडी बाद केला.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्या सामन्यातील पराभवासाठी राहुलने ‘या’ खेळाडूंना ठरविले दोषी; म्हणाला… (mahasports.in)