इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम (IPL 2022) खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी मेगा लिलाव (Mega Auction) झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहाला मिळाली. या लिलावात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांनीही जुन्या ८ संघांसह सहभाग घेतला होता. वेस्ट इंडीज येथे झालेला एकोणीस वर्षाखालील मुलांचा क्रिकेट विश्वचषक गाजवणारा उस्मानाबादचा वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगारगेकर (Rajwardhan Hangargekar) याने देखील या लिलावात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याला चेन्नई सुपर किंग्सने दीड कोटींची बोली लावत आपल्या ताफ्यात सामील केले. यानंतर राजवर्धन याची प्रतिक्रिया समोर आली आहे. (Rajwardhan Hangargekar CSK)
काय म्हणाला राजवर्धन
आयपीएलच्या मेगा लिलावात वेगवान गोलंदाजांना मोठी मागणी असल्याचे दिसून आले. दीपक चहर, अवेश खान व प्रसिद्ध कृष्णा या भारतीय वेगवान गोलंदाजांना १० कोटींपेक्षा जास्त बोली लागली. वेस्ट इंडीज येथे झालेला एकोणीस वर्षाखालील मुलांचा विश्वचषक गाजवणारा महाराष्ट्राचा युवा वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगारगेकर याला गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने दीड कोटींची सर्वोच्च बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतले. लिलावानंतर बोलताना राजवर्धनने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला,
”सीएसकेमध्ये जाऊन मी खरोखरच खूप आनंदी आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तो माझ्या वडिलांचा आवडता संघ होता. आज ते असते तर त्यांच्या आवडत्या संघासाठी मला खेळताना पाहून त्यांना अधिक आनंद झाला असता.”
महाराष्ट्रातील उस्मानाबादचा रहिवासी असलेल्या राजवर्धनच्या वडिलांचे २०२० मध्ये कोरोनामूळे निधन झाले होते. राजवर्धनने याचवेळी पैशापेक्षा खेळायला मिळणे अधिक महत्त्वाचे असल्याचे म्हटले. सध्या तरी माझे लक्ष केवळ चांगली कामगिरी करण्यावर असल्याचे त्याने सांगितले. राजवर्धन हा सातत्याने १४५ किमी वेगाने गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. तसेच तो खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत मोठे फटके खेळू शकतो.
महत्वाच्या बातम्या-
अनसोल्ड गेलेल्या अमित मिश्रासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या संघमालकाची भावूक पोस्ट; लिहीले… (mahasports.in)
डू प्लेसिस, कोहली, मॅक्सवेल; कोण होईल आरसीबीचा भावी कर्णधार? माइक हेसनने केला खुलासा (mahasports.in)