12 ते 15 फेब्रुवारीदरम्यान रणजी ट्रॉफीच्या 2019-20 हंगामातील साखळी सामन्यांची शेवटची 9 वी फेरी पार पडली. गेल्या 2 महिन्यात 38 संघाच्या एकूण 3 गटांचे मिळून 169 सामने खेळण्यात आले. यानंतर आता तीन गटातील मिळून 8 संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. यामध्ये गतउपविजेता सौराष्ट्र, गुजरात,आंध्रप्रदेश, बंगाल, कर्नाटक, गोवा, जम्मू आणि काश्मिर आणि ओडिशा या संघाचा समावेश आहे.
विशेष म्हणजे या हंगामात मुंबई, दिल्ली, गतविजेता विदर्भ, तमिळनाडू, महाराष्ट्र हे मोठे संघ अंतिम 8 संघात प्रवेश करण्यात अपयशी ठरले आहेत.
आता उपांत्यपूर्व फेरीत गुजरातचा सामना गोव्याविरुद्ध सरदार वल्लाभाई पटेल स्टेडियम, वलसाद येथे होणार आहे. तर जम्मू आणि काश्मिर संघाचा सामना कर्नाटकविरुद्ध होणार आहे. तसेच सौराष्ट्र विरुद्ध आंध्रप्रदेश संघात उपांत्यपूर्व सामना होईल आणि बंगालचा उपांत्यपूर्व सामना ओडिशा विरुद्ध कटक येथे होईल.
उपांत्यपूर्व फेरीचे हे सामने 20 ते 24 फेब्रुवारीदरम्यान होणार आहेत.
२० फेब्रुवारीपासून अशा होणार रणजी ट्राॅफी स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीच्या लढती.
????????बंगाल वि ओदिशा
????????सौराष्ट्र वि आंध्रप्रदेश
????????कर्नाटक वि जम्मू काश्मिर
????????गुजरात वि गोवा
महाराष्ट्रातील मुंबई, महाराष्ट्र व विदर्भ संघ स्पर्धेबाहेर #ranjitrophy #ranji @bcci pic.twitter.com/G6pLHFKRNZ— Maha Sports (@Maha_Sports) February 16, 2020
एलिट ग्रुप ए आणि बी –
या गटातून सौराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, बंगाल आणि कर्नाटक हे संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहचले आहेत. या गटातून साखळी सामन्यांच्या अंतिम 9 व्या फेरीनंतर गुजरात(35 गुण), सौराष्ट्र(31 गुण) आणि आंध्रप्रदेश(27 गुण) यांनी आधीच अंतिम 8 संघातील स्थान पक्के केले होते.
पण बंगाल आणि कर्नाटकने 9 व्या फेरीच्या अखेरच्या दिवशी त्याचे स्थान पक्के केले. बंगालने पंजाबला 48 धावांनी पराभूत करत तर कर्नाटकने बडोद्याला 8 विकेट्सने पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
ग्रुप सी –
या गटातूल जम्मू आणि काश्मिर व ओडिशा या संघानी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या गटात जम्मू आणि काश्मिरने सर्वाधिक 39 गुण मिळवले. त्यांनी 9 व्या फेरीत हरियाणाला 2 विकेट्सने पराभूत केले. तर ओडिशा 38 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. ओडिशाने 9 व्या फेरीत झारखंड विरुद्ध सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले.
प्लेट ग्रुप –
या गटातून गोव्याने सर्वाधिक 50 गुण मिळवत अंतिम 8 संघात स्थान पक्के केले. गोव्याने साखळी सामन्यांच्या 9व्या फेरीत मिझोरम विरुद्ध एक डाव आणि 211 धावांनी मोठा विजय मिळवला. त्यांनी या हंगामात एकूण 9 सामन्यांपैकी 7 सामने जिंकले आहेत.
न्यूझीलंडचा हा खेळाडू घेतोय भारतीय गोलंदाजांकडून गोलंदाजीचे धडे
वाचा- ????https://t.co/vBpJnYqPG8????— Maha Sports (@Maha_Sports) February 18, 2020
ज्युनियर द्रविडचा फलंदाजीत राडा! २ महिन्याच्या आत ठोकले दुसरे द्विशतक
वाचा????https://t.co/wMB8dyi3ox????#म #मराठी #Cricket #TeamIndia #SamitDravid #Dravid— Maha Sports (@Maha_Sports) February 18, 2020