मदतीत मुंबईकर पुढे: मुंबई क्रिकेट संघटनेची मु्ख्यमंत्री रिलीफ फंडाला मदत

जगभरात कोरोना व्हायरसचा धोका वाढत आहे. त्यामुळे अनेक जण कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठीही पुढे आले आहेत. यात मुंबई क्रिकेट संघटनेने पुढाकार घेतला आहे.  कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबई क्रिकेट संघटना मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५० लाख रुपये देणार आहे.

याची माहिती मुंबई क्रिकेट संघटनेच्या ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली आहे. “मुख्यमंत्री सहाय्यकता निधीला मुंबई क्रिकेट संघटना ५० लाख देणार आहे. या निधीचा वापर कोरोनाविरोधी लढ्यासाठी वापरला जाणार आहे. या कठीण काळात मुंबई क्रिकेट संघटना महाराष्ट्र सरकारला शक्य ती सर्व मदत करणार आहे, ” असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

यापुर्वी क्रिकेट वर्तुळात बंगाल क्रिकेट संघटनेने २५ लाख रुपये, सौरव गांगुलीने ५० लाखांचा तांदूळ कोरोना बाधीतांसाठी दिला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या कराराच्या यादीत असलेल्या १७ खेळाडूंसह एकूण २७ खेळाडू वेतन दान करणार आहेत. अन्य १० खेळाडूही बांगलादेश संघाकडून खेळले आहेत.

ट्रेडिंग घडामोडी – 

टीम इंडिया जिथं १२ सामने खेळली ते मैदान आता होणार कोरोना बाधितांसाठी आयसोलशन सेंटर

कबड्डीची जर्सी उतरवुन पोलीसांच्या जर्सीत हा कबड्डीपटू करतोय लोकांची मदत

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळताना टिच्चून फलंदाजी करणारे ५ फलंदाज

You might also like