अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये अचानक मोठा गोंधळ उडाला आहे. कर्णधार राशिद खानने आयसीसीच्या टी-२० संघाची घोषणा झाल्यानंतर लगेचच आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. राशिदच्या म्हणण्यानुसार संघाच्या निवडीमध्ये त्याचे मत घेतले गेले नाही आणि म्हणून तो त्याच्या पदाचा राजीनामा देत आहे. राशिदने कर्णधारपद सोडल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ही जबाबदारी माजी कर्णधार मोहम्मद नबीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
गुरुवारी (९ सप्टेंबर) रात्री, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पुढील महिन्यात यूएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला. संघाचा कर्णधार राशिद खान म्हणाला की, या संघ निवड प्रक्रियेमध्ये त्याचा समावेश केला गेला नव्हता.
निवड समितीने त्याच्याशी कुठलाही संपर्क न साधता, संघाची निवड प्रकिया राबविली आणि संघ जाहीर केला. त्यानंतर अफगाणिस्तानच्या माध्यमातून यासंदर्भात बातम्या प्रसिद्ध झाल्या. कर्णधाराच्या मताशिवाय संघाची निवड करण्यात आल्याने राशिदने नाराजी व्यक्त केली आहे.
🙏🇦🇫 pic.twitter.com/zd9qz8Jiu0
— Rashid Khan (@rashidkhan_19) September 9, 2021
राशिदच्या राजीनाम्यानंतर नबीने ट्विटरच्या माध्यमातून कर्णधारपदाची जबाबदारी मिळवण्याबाबत माहिती दिली. त्याने लिहिले की, ‘या कठीण काळात दिलेल्या कर्णधारपदाचे मी कौतुक करतो.’
At this critical stage, I admire the decision of ACB for the announcement of leading the National Cricket Team in T20 Format. InshaAllah together we will present a great picture of the Nation in the upcoming T20 World Cup.
— Mohammad Nabi (@MohammadNabi007) September 9, 2021
या अचानक झालेल्या भूकंपानंतरही अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने बंडखोर कर्णधारापुढे झुकणार नाही, असे आपले इरादे स्पष्ट केले आहेत. टी-२० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेला संघ अंतिम आहे आणि कर्णधाराच्या नाराजीनंतरही त्यात कोणताही बदल केला जाणार नाही. केवळ राशिदच्या जागी या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी नबीला संघाचा कर्णधार करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
नियमांनुसार कर्णधारास संघ निवड प्रक्रियेत सहभागी करून घेणे आवश्यक असते, किंतु अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने यास बगल देत संघ जाहीर केला आहे. अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत आल्यानंतर राशिद खानने याबाबत चिंता व्यक्त केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: भारतीय मूळच्या अमेरिकन फलंदाजाने केली कमाल! गिब्सनंतर वनडेत ठोकले सलग ६ षटकार
ओव्हल कसोटीचा हिरो ठरलेला बुमराह अखेरच्या सामन्यात होऊ शकतो बाहेर, ‘हे’ आहे कारण
‘स्वप्न पूर्ण होतात!’ टी२० विश्वचषकासाठी निवड झाल्यानंतर सूर्यकुमारची भावूक पोस्ट