अफगाणिस्तानमध्ये तालिबानने कब्जा केला आहे. अफगाणिस्तानमध्ये जे सुरू आहे,ते पाहून अनेकांचा थरकाप उडाला असेल. अफगानिस्तामध्ये सुरू असलेल्या प्रकाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अशातच अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खानने एक संदेश दिला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे.
राशिद खान सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड लीग स्पर्धेत ट्रेंट रॉकेट्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. अफगाणिस्तानमध्ये जे काही सुरू आहे, ते पाहून राशिद खानने सोशल मीडियाद्वारे निराशा व्यक्त केली होती. परंतु, आता तो द हंड्रेड लीग स्पर्धेतील एका सामन्यात आपल्या गालावर अफगाणिस्तानचा झेंड्याचे चित्र काढून आला होता.
राशिद खानने असे करण्यामागचे कारण असे की, त्याला सर्वांना प्रेम आणि शांतीचा संदेश द्यायचा होता. कारण अफगाणिस्तानमध्ये, तालिबानी निर्दोष लोकांची हत्या करत आहेत. राशिद खानने केलेल्या या कृत्याचे सोशल मीडियावर तोंडभरून कौतुक केले जात आहे. यापूर्वी त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी देखील शेअर केली होती, ज्यामध्ये त्याने,’अफगानिस्तानातील लोकांसाठी प्रार्थना करा’ असे लिहिले होते.(Rashid Khan made a flag on his face in the hundred cricket league)
Today let us take some time to value our nation and never forget the sacrifices. We hope and pray for the peaceful , developed and United nation INSHALLAH #happyindependenceday ???????????????? pic.twitter.com/ZbDpFS4e20
— Rashid Khan (@rashidkhan_19) August 19, 2021
Rashid Khan with the Afghanistan flag on his cheek – good way to support the country. pic.twitter.com/tW2zPfQsl7
— Johns. (@CricCrazyJohns) August 20, 2021
द हंड्रेड क्रिकेट लीग स्पर्धा संपल्यानंतर राशिद खान आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने येत्या १९ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. हे सामने युएईमध्ये पार पडणार आहेत. राशिद खान या स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करतो. या संघातील तो मुख्य खेळाडू आहे.
त्याने आतापर्यंत सनरायझर्स हैदराबाद संघासाठी एकूण ६९ सामने खेळले आहेत. यात त्याने ६.२३ च्या इकॉनॉमीने गोलंदाजी करत २५ गडी बाद केले आहेत. आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिला टप्प्याच्या अखेरीस खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती, ज्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनी आणि रैनाच्या उपस्थितीत सीएसकेच्या मॅनेजरचा वाढदिवस जोरदार साजरा,पाहा व्हिडिओ
अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारासोबत तालिबानच्या नेत्यांनी घेतली भेट; दिले ‘हे’ अश्वासन
आयपीएलमध्ये देखील ‘द हंड्रेड’च्या ‘या’ नियमाला लागू केले पाहिजे, माजी इंग्लिश खेळाडूचा सल्ला