आशिया चषक २०२२ स्पर्धेला सुरुवात होण्यास अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. चार वर्षानंतर होत असलेल्या या स्पर्धेत सहा संघ सहभागी होतील. २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना श्रीलंका व अफगाणिस्तान यांच्या दरम्यान खेळला जाईल. त्याचवेळी अफगाणिस्तान संघाचा प्रमुख फिरकीपटू राशिद खानने भारताचा विराट कोहली व पाकिस्तानचा बाबर आझम यांच्यातील तुलनेविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राशिदला बाबर व विराट यांच्यापैकी कोणाला गोलंदाजी करताना अधिक काळजी घ्यावी लागते असे विचारले असता, तो म्हणाला,
“माझ्यासाठी त्या दोघांनाही गोलंदाजी करणे तितकेच कठीण आहेत. ते ज्या प्रकारचे फलंदाज आहेत, ते एकही चेंडू सोडणार नाहीत. त्यामुळे माझ्यासाठी दोघांनाही गोलंदाजी करणे कठीण आहे. मात्र, मी आव्हानाचा आनंद घेतो. मी या दोघांना खराब चेंडू टाकेन अशी कोणतीही शक्यता नाही. मी योग्य ठिकाणी गोलंदाजी करण्यावर लक्ष केंद्रित करेन.”
तो पुढे म्हणाला,
“बाबर आणि विराटला गोलंदाजी करणे जितके आव्हानात्मक असते तितकेच शिकण्यासारखे असते. जेव्हा मी सनरायझर्ससाठी खेळायचो तेव्हा केन विल्यमसनला गोलंदाजी करायचो. तेव्हा आमच्या खेळाबद्दल खूप गप्पा झाल्या. मी आयपीएलमध्येही विराटशी चर्चा केली होती. तसेच बाबरशी देखील बोलणे झाले आहे.”
अफगाणिस्तान संघ श्रीलंकेविरुद्ध आपल्या अभियानाची सुरुवात करेल. मागील आशिया चषकात अफगाणिस्तानने चांगली कामगिरी करत भारताविरुद्ध सामना बरोबरीत सोडवला होता. यावेळी एक युवा संघ अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबी याच्या नेतृत्वात विरोधी संघांना टक्कर देईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईचे क्रीडापटू मयूर व्यास यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’च्या ‘लाइफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड्स’ ने गौरव
दुलीप ट्रॉफीसाठी सज्ज पूर्व विभाग; क्रिडामंत्री कर्णधार तर आयपीएल गाजवणारे साथीदार
थांबायचं नाय गड्या! नेट्समध्ये सोडा विराट कोहली दुबईच्या रस्त्यांवरही करतोय बॅटिंगची प्रॅक्टिस