आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल अर्थात आयसीसीने सोमवारी (२८ डिसेंबर) दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. यातील सर्वोत्तम टी२० क्रिकेटपटूचा पुरस्कार अफगानिस्तानचा फिरकीपटू राशिद खान याला देण्यात आला आहे. आपल्या गोलंदाजीने फलंदाजांच्या बत्त्या गुल करणाऱ्या या गोलंदाजाने १ जानेवारी २०११ ते ७ ऑक्टोबर २०२० या कालावधीत टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. सोबतच चाहत्यांनीही त्याला सर्वोत्तम टी२० क्रिकेटपटू म्हणून पसंती दिली आहे.
राशिद खानचे वक्तव्य
हा मानाचा पुरस्कार मिळाल्यानंतर राशिदने आयसीसी आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. तो म्हणाला की, “मला आयसीसीचा दशकातील सर्वोत्तम टी२० क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद झाला. आयसीसीचे आणि चाहत्यांचे आभार मानण्यासाठी माझे शब्द अपुरे पडतील. अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या एखाद्या क्रिकेटपटूला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल, असे मला कधीही वाटले नव्हते. हा माझ्या आयुष्यातील खूप खास क्षण आहे.”
💬 "I am speechless after this award and happy for the fans. For someone from Afghanistan to get this award, it's a special moment for me."
📽️ Rashid Khan's heartwarming reaction to winning the ICC Men’s T20I Cricketer of the Decade award 👏#ICCAwards pic.twitter.com/l404BarWId
— ICC (@ICC) December 28, 2020
राशिद खानची कामगिरी
राशिदने १ जानेवारी २०११ ते ७ ऑक्टोबर २०२० या कालावधीत टी२० क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन केले आहे. त्याने या कालावधीत १२.६२च्या सरासरीने सर्वाधिक ८९ विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान त्याने तीनवेळा एका डावात ४ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. तसेच २ वेळा एका डावात ५ फलंदाजांना तंबूत धाडले आहे.
🇦🇫 RASHID KHAN is the ICC Men’s T20I Cricketer of the Decade 👏👏
☝️ Highest wicket-taker in the #ICCAwards period ➜ 89
🅰️ 12.62 average 🤯
💥 Three four-wicket hauls, two five-forsWhat a story ❤️ pic.twitter.com/Y59Y6nCs98
— ICC (@ICC) December 28, 2020
आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम टी२० संघातही पटकावले स्थान
एवढेच नव्हे तर, आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम टी२० संघातही राशिदला स्थान देण्यात आले आहे. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्या हातात या संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे सोपवली आहेत. धोनीव्यतिरिक्त रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या भारतीयांनाही या संघात संधी मिळाली आहे. सोबतच ख्रिस गेल, ऍरॉन फिंच, एबी डिविलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, कायरन पोलार्ड आणि लसिथ मलिंगा यांचाही या संघात समावेश आहे.
महत्त्वाचे म्हणजे, राशिद आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम टी२० संघात स्थान मिळवणारा एकमेव अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एलिसा पेरीचाच डंका! एक-दोन नव्हे तर जिंकलेत आयसीसीचे ‘हे’ तिन्ही मोठे पुरस्कार
ब्रेकिंग! ‘रनमशीन’ विराट कोहली ठरला आयसीसीचा दशकातील सर्वोत्तम क्रिकेटर