भारतीय क्रिकेट संघाचा युवा फिरकीपटू रवी बिश्नोई हा पदार्पण केल्यापासून भारतीय संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करतोय. त्याच्या कामगिरीत सातत्य असले तरी, आगामी टी20 विश्वचषकासाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. संघ निवडीनंतर त्याने तशी काही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, नुकतेच त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत आपल्या भावना मोकळ्या केल्या आहेत.
रवी बिश्नोईला फेब्रुवारी 2022 ते सप्टेंबर 2022 दरम्यान एकूण 10 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने 7.08 च्या इकॉनॉमी रेटने 274 धावा केल्या आणि 17.12 च्या सरासरीने 16 विकेट घेतल्या. आशिया चषक 2022 साठी रवी बिश्नोईचा देखील टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला होता. त्यानंतर असे मानले जात होते की, तो 2022 च्या टी20 विश्वचषकातही संघाचा भाग असेल, परंतु तसे झाले नाही. बिश्नोई हा मुख्य संघाचा भाग नसला तरी, स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठीही त्याला संघात स्थान मिळालेले नाही.
रवीने आपल्या इंस्टाग्राम हॅण्डलवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने लिहिले,
‘सूर्य पुन्हा उगवेल मी पुन्हा प्रयत्न करेन’
त्याच्या या पोस्टमुळे तो विश्वचषक संघात स्थान न मिळाल्याने नाराज असल्याचे दिसून येत आहे. तो मुख्य संघात सहभागी नसला तरी भविष्यात तोच भारतीय फिरकी गोलंदाजीचे नेतृत्व करू शकतो. रवी 2020 अंडर नाईन्टीन विश्वचषकात सर्वाधिक बळी घेऊन चर्चेत आला होता. त्यानंतर पंजाब किंग्ससाठी आयपीएलमध्ये त्याने सलग दोन हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली. यानंतर आयपीएलमध्ये प्रथमच सहभागी होत असलेल्या लखनऊ सुपरजायंट्सने लिलावापूर्वीच त्याला आपल्या संघात ड्राफ्ट केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कार्तिकला घ्या ‘त्याला’ काढा! माजी दिग्गजाची टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर मोठी प्रतिक्रिया
पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीगमध्ये परमार ऑल स्टार्स, आरएस कॅनन्स, बॉल ब्रेकर्स, द व्हर्लविंड्स संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश