इंडियन प्रीमियर लीग ही अशी क्रिकेट स्पर्धा आहे, जिथे जगभरातील मोठमोठ्या क्रिकेट संघातील अनुभवी आणि युवा खेळाडू खेळताना दिसतात. याबरोबर आयपीएलमधून खेळाडूंना मिळणारा चिक्कार पैसा, प्रसिद्धी अशा अनेक गोष्टींमुळे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते की, त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळावी. काल (२० सप्टेंबर) भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील युवा खेळाडू रवि बिश्नोईचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. Ravi Bishnoi IPL Debut Against Delhi Capitals
काल दुबई येथे खेळण्यात येत असलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यातून बिश्नोईने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलने बिश्नोईला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिल्यामुळे त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले.
आपल्या पहिल्याच सामन्यात या २० वर्षीय फिरकीपटू बिश्नोईने दिल्लीचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला तंबूचा रस्ता दाखवला. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना केवळ २२ धावा देत हा कारनामा केला.
बिश्नोई हा प्रतिभाशाली खेळाडू आहे. त्याने १९ वर्षांखालील विश्वचषकात आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याने १९ वर्षांखालील बांग्लादेश संघाविरुद्धच्या अंतिम सामन्यात १० षटके गोलंदाजी करत ३० धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. तर, संपूर्ण विश्वचषकात एकूण २२ विकेट्स घेण्याचा पराक्रमही त्याने केला होता.
याव्यतिरिक्त देशांतर्गत स्तरावरील टी२० क्रिकेटमध्ये बिश्नोईने ६ सामने खेळत ६ विकेट्स घेतल्या आहेत. तर अ दर्जाच्या क्रिकेटमध्येही त्याने ६ सामन्यात ८ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल इतिहासातील ३ फलंदाज, ज्यांनी डावातील शेवटच्या ३ षटकात कुटल्यात सर्वाधिक धावा
संघाचा डाव सावरत असलेले दिल्लीचे २ मोहरे झाले सलग बाद, पण ‘हा’ खेळाडू ठरला गेमचेंजर
षटकार- चौकारांची बरसात करत मार्कस स्टोयनीसने केला अजब कारनामा
ट्रेंडिंग लेख –
पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारे पहिले हिंदू अनिल दलपत
यावर्षी सीएसकेसाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो ‘हा’ अष्टपैलू खेळाडू
२२ व्या वर्षी दिग्गजांच्या पंक्तीत सामील झालेला राशिद खान