Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विराटच्या यशाने शास्त्रींचा आनंद गगनात मावेना; म्हणाले, “त्याने आता सर्वांची…”

October 25, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
kohli-shastri

Photo Courtesy: Twitter/ ICC


टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील सुपर 12 फेरीच्या चौथ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) संघ आमने- सामने  होते. या सामन्यात भारतीय संघाने 4 गडी राखून सामना जिंकला. या सामन्यात भारताच्या विजयाचा शिल् विराट कोहली (Virat Kohli) ठरला. नाबाद अर्धशतकी खेळी करत त्याने अशक्यप्राय वाटणारा विजय अक्षरशा खेचून आणला. मागील काही काळापासून अपयशी ठरत असलेल्या विराटवर टीका केली जात होती. मात्र, या खेळीने त्याने सर्वांची तोंडे बंद केली आहेत. त्याचवेळी भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू व माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराटबाबत एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

केएल राहुल दुसऱ्याच षटकात माघारी परतल्यानंतर विराट फलंदाजासाठी मैदानात उतरला. तो मैदानात आल्यानंतर सातव्या षटकापर्यंत भारताने चार गडी गमावले होते. त्यानंतर त्याने हार्दिक पंड्यासह 103 धावांची भागीदारी करत भारतीय संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. विराटने अखेरपर्यंत नाबाद राहत 53 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 82 धावांची खेळी केली. विराटला या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच्या या खेळीनंतर अजूनही त्याचे कौतुक केले जात आहे.

एका प्रमुख वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शास्त्री म्हणाले,

“विराटच्या या खेळीने अनेकांना आश्चर्य वाटले असेल मात्र मला नाही. मला माहित होते ऑस्ट्रेलियात ही खेळी येणार आहे. त्याला ऑस्ट्रेलियात खेळायला आवडते. त्याने मोठ्या संधीचा फायदा घेत मोठी खेळी केली.”

विराटने या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ याला लगावलेल्या षटकाराची तुलना सचिन तेंडुलकरने 2003 विश्वचषकात शोएब अख्तरला मारलेल्या षटकाराशी केली‌. त्याचवेळी त्यांनी असे देखील म्हटले की, विराटच्या वाईट काळात त्याच्यावर टीका करणाऱ्या सर्वांचे तोंडे त्याने या खेळीनंतर बंद केली आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘त्याला जास्त वेळ शांत ठेवणे म्हणजे…’, वाचा विराटविषयी ब्रेट ली काय म्हणाला
विराटची ऑस्ट्रेलियात विक्रमांची माळ! ‘हा’ पराक्रम तुम्हाला नक्कीच माहिती नसणार 


Next Post
Tim Paine

'दक्षिण आफ्रिकी खेळाडूनेही चेंडूशी छेडछाड केली होती', माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराचा मोठा खुलासा

Photo Courtesy: Twitter

चित्याची चपळाई म्हणतात ती ही! वॉर्नरची अशी फिल्डिंग पाहून व्हाल अवाक्; पाहा व्हिडिओ

Photo Courtesy: Twitter/ICC

स्टॉयनिसच्या वादळात उडाली श्रीलंका! तुफानी अर्धशतकाने विजय टाकला ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143