लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवशी (१४ ऑगस्ट)इंग्लिश फलंदाजांचा बोलबाला होता. परंतु, ईशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज यांनी जोरदार प्रत्युत्तर देत भारतीय संघाला पुनरागमन करून दिले होते. दरम्यान भारतीय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यावर चाहते मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून असतात. नेटकरी त्यांना ट्रोल करण्याची कुठलीही संधी सोडत नाही. अशातच दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी (१४ ऑगस्ट) देखील रवी शास्त्री नेटकऱ्यांच्या तडाख्यात सापडले आहेत.रवी शास्त्री लॉर्ड्सच्या गॅलरीत बसुन डुलक्या घेताना दिसून आले होते. हे पहिल्यांदा पाहायला मिळालेले नाही. यापूर्वी देखील त्यांचे अनेक असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
ट्विटरवर एका युजरने त्यांना ट्रोल करण्यासाठी त्यांचा डुलक्या घेत असल्याचा फोटो शेअर करत लिहिले होते की,”हा फोटो सामन्याची स्थिती सांगत आहे.” हा फोटो जेव्हा क्लिक केला गेला, त्यावेळी इंग्लडचा कर्णधार जो रूट भारतीय गोलंदाजांच्या अडचणीत वाढ करत होता. हेच कारण होते की,सामना बोरिंग वाटू लागला होता.(Ravi Shastri sleeping in lords balcony, photo went viral on social media)
https://twitter.com/Bhuban64039498/status/1426777762333790218
रवी शास्त्री यांचा कार्यकाळ आगामी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धा झाल्यानंतर संपणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने २०१९ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने प्रवेश केला होता. परंतु, या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की, रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती केली जाते. या पदासाठी राहुल द्रविड यांना प्रबळ दावेदार मानले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
लॉर्ड्स कसोटीत नेहराच्या तोंडून निघाले असे शब्द अन् पुढच्याच चेंडूवर पंत बाद, झाला भरपूर ट्रोल
इशांत अन् कर्णधार विराटने असा डावपेच आखून इंग्लंडच्या २ अष्टपैलूंचा केला गेम, व्हिडिओ व्हायरल
नॉटिंघम कसोटीचा हिरो लॉर्ड्समध्ये बनला विलेन, चाहत्यांवर आली ‘बुमराह प्लिज नो बॉल’ म्हणण्याची वेळ






