---Advertisement---

शास्त्री गुरुजींनी सुचवले टीम इंडियाचे नवे कॉम्बिनेशन! म्हणाले, “ते दोन जण संघात हवेत”

On: सोमवार, जून 26, 2023 11:59 AM
ravi-shashtri
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाला ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात अति महत्त्वाची अशी वनडे विश्वचषक स्पर्धा खेळायची आहे. बारा वर्षांपासून सुरू असलेला विश्वचषकाचा वनवास भारतीय संघ यावेळी संपवू इच्छितो. विश्वचषकासाठी आता अवघे काही महिने शिल्लक असताना, भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक व दिग्गज क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी भारतीय संघाला एक सल्ला दिला आहे. 

यावेळी विश्वचषक भारतात होत असल्याने भारतीय संघाला विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहे. या विश्वचषकात भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात उतरेल. मात्र, विश्वचषकात भारताच्या फलंदाजी कामात पहिल्या सहामध्ये दोन डावखुरे फलंदाज असावे, अशी इच्छा शास्त्री यांनी व्यक्त केली.

एका मुलाखतीत बोलताना ते म्हणाले,

“भारतीय संघ सध्या उत्कृष्ट कामगिरी करतोय. फलंदाजी देखील मजबूत आहे. मात्र, पहिल्या सहा फलंदाजांमध्ये दोन डावखुरे फलंदाज असायला हवेत. त्यामुळे फलंदाजी क्रमात विविधता येते.”

ते पुढे बोलताना म्हणाले,

“आपल्याकडे आता ईशान किशनच्या रूपाने एक सक्षम पर्याय आहे. तसेच तिलक वर्मा देखील संघात जागा बनवू शकतो. रवींद्र जडेजाला देखील वरच्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देता येऊ शकते.”

यापूर्वी भारतीय संघात सलामीवीर म्हणून शिखर धवन हा मोठ्या कालावधीसाठी दिसत होता. तसेच मधल्या फळीत संघाला योगदान देत. सध्या केवळ रवींद्र जडेजा हा एकमेव डावखुरा अष्टपैलू असून, भारतीय संघातील नियमित सदस्य आहे.

विश्वचषकासाठी भारतीय संघात रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली सूर्यकुमार यादव व श्रेयस अय्यर या फलंदाजांची जागा निश्चित मानली जातेय. याव्यतिरिक्त ईशान किशन व संजू सॅमसन यांच्या नावाचा देखील विचार केला जाऊ शकतो.

(Ravi Shastri Suggest India Need Two Left Handers In Top 6)

महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघाला मोठा धक्का, आशिया चषकातून ‘हा’ हुकमी एक्का बाहेर! लगेच वाचा
सरफराजची टीम इंडियात निवड न होण्यामागील मोठे कारण आले समोर, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने वाचला चुकांचा पाढा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---