गुरुवारी (दि. 9 फेब्रुवारी) नागपूर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पहिला कसोटी सामना सुरू झाला. यादरम्यान भारतीय संघाने पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवत मालिका जिंकण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. त्याचवेळी भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक व समालोचक रवी शास्त्री यांनी ऑस्ट्रेलियन संघ तसेच ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजांना खेळपट्टीच्या मुद्द्यावरून सणसणीत चपराक लावली.
नागपूर कसोटी सुरू होण्याआधी खेळपट्टीबाबत मोठी चर्चा सुरू होती. सामन्याच्या पहिल्या दिवसापासूनच चेंडू वळणार तसेच भारतीय संघ मायदेशात नेहमीच फिरकीला मदतगार खेळपट्ट्या बनवतो, अशा प्रकारची वक्तव्ये ऑस्ट्रेलियन संघ व काही माजी खेळाडूंनी केली होती. त्यामुळे काही माजी भारतीय क्रिकेटपटू नाराज झालेले.
प्रत्यक्ष सामना सुरू झाल्यावर खेळपट्टीवर कोणत्याही प्रकारे फिरकीपटूंना मदत मिळाली नाही. एखाद दुसरा चेंडू वळताना दिसला. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी पहिल्या दोन षटकातच ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर माघारी पाठवले. त्यानंतर चेंडू न वळवताही जडेजाने पाच तर अश्विनने तीन बळी घेत ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 177 धावांवर संपुष्टात आणला.
ऑस्ट्रेलियाचा डाव संपल्यानंतर भारताचे माजी प्रशिक्षक व समालोचक रवी शास्त्री यांनी ऑस्ट्रेलियन संघावर खोचक टीका केली. ते म्हणाले,
“मागील काही दिवसांपासून खेळपट्टीबाबत खूप चर्चा होत होती. 24 तासापूर्वी खेळपट्टीविषयी खूप आवाज वाढलेला. आता काय झाले? कुठे गेला आवाज?”
ज्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा निभाव लागला नाही, त्या खेळपट्टीवर भारतीय सलामीवीरांनी शानदार खेळ दाखवला. कर्णधार रोहित शर्मा याने नाबाद अर्धशतक झळकावले. तर, केएल राहुल याने देखील संघर्षपूर्ण 20 धावांची खेळी केली. दुसऱ्या दिवशी उत्कृष्ट फलंदाजी करत पहिल्या डावात मोठी आघाडी मिळवण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेल.
(Ravi Shastri Troll Australia Team And Critics After Nagpur Test First Day)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत वि. ऑस्ट्रेलिया । जडेजा-आश्विनच्या फिरकीची कमाल, 177 धावांत आटोपला ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव
जडेजाचे दमदार पुनरागमन, चेंडू हातात घेताच तीन ऑस्ट्रेलियन फलंदाजांना धाडले तंबूत