मैदानात जरी विविध देशांचे खेळाडू एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहात असले, तरी मैदानाबाहेर अनेकदा त्यांची चांगली मैत्री असल्याचे दिसते. तसेच अनेक क्रिकेटपटू सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करतानाही दिसतात. नुकतेच भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन आणि इंग्लंडची महिला फलंदाज डॅनिएल वॅट यांच्यातील ट्विटरवरील संभाषणाने अनेक क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
अश्विन-वॅटमध्ये गमतीशीर संभाषण
बुधवारी (१५ जुलै) इंग्लंड महिला विरुद्ध भारतीय महिला संघात टी२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने ८ विकेट्सने विजय मिळवत मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. इंग्लंडच्या या विजयात डॅनिएल वॅटने महत्त्वपूर्ण वाटा उचलला. तिने इंग्लंडकडून भारताने दिलेल्या १५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ५६ चेंडूत १२ चौकार आणि १ षटकारासह ८९ धावांची खेळी केली.
तिच्या या खेळीचे आर अश्विनने कौतुक केले. त्याने ट्विट केले की ‘डॅनी वॅटने मस्त खेळी केली. मालिका विजयाबद्दल इंग्लंडचे कौतुक. भारतीय संघही संपूर्ण मालिकेत तितकाच प्रतिभाशाली दिसला.’
Quality knock that from Dani Wyatt! Well done England on a fantastic series win and India were equally impressive throughout too. ???????? #indvseng
— Ashwin ???????? (@ashwinravi99) July 14, 2021
अश्विनच्या या ट्विटला वॅटने काहीसे गमतीशीर उत्तर देताना लिहिले की ‘धन्यवाद अश्विन. क्रिकेटमधील दिग्गजाकडून कौतुक झाल्याने छान वाटत आहे. आमच्या संघाविरुद्धच्या मालिकेसाठी शुभेच्छा, पण खूप चांगली कामगिरीही नको.’
भारतीय पुरुष कसोटी संघाला ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
Thanks a lot Ashwin! Nice to receive kind words from a legend in the game. Good luck v our boys but not too much ???? https://t.co/8kEme3tBuu
— Danielle Wyatt (@Danni_Wyatt) July 15, 2021
वॅटच्या या ट्विटवर पुन्हा अश्विनने उत्तर दिले. त्याने हसण्याच्या आणि इतर इमोजींसह लिहिले की ‘धन्यवाद आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी तुलाही शुभेच्छा.’ या ट्विटला पुन्हा एकदा प्रतिउत्तर देताना वॅटने अश्विनचे आभार मानले.
????????????. Thank you and good luck with the kiwis ????????????????
— Ashwin ???????? (@ashwinravi99) July 15, 2021
???????? thank you Ash!! Enjoy
— Danielle Wyatt (@Danni_Wyatt) July 15, 2021
इंग्लंड महिला संघाला न्यूझीलंड महिला संघाविरुद्ध सप्टेंबरमध्ये मर्यादीत षटकांच्या मालिका खेळायच्या आहेत. (Ravichandran Ashwin and Danielle Wyatt’s conversation on Twitter)
अश्विनची काउंटी सामन्यांत चमकदार कामगिरी
अश्विन इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यापूर्वी सरे संघाकडून सोमरसेटविरुद्ध काउंटी चॅम्पियनशीपचा सामना खेळला. या सामन्यात त्याने ६ विकेट्स घेतल्या. आता अश्विन भारतीय संघाकडून २० ते २२ जुलैदरम्यान होणाऱ्या सराव सामन्यात खेळताना दिसेल. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध भारत संघात ४ ऑगस्टपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरु होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताविरुद्ध सराव सामना खेळण्यासाठी काउंटी इलेव्हन सज्ज, ‘या’ १४ खेळाडूंची संघात निवड
‘कुल-चा’ जोडी एकत्र म्हणजे मजामस्तीची खात्री! विराट, धोनीची नक्कल करतानाचा व्हिडिओ व्हायरल