---Advertisement---

‘प्रोफेसर अश्विनच्या डाव्या हाताचा खेळ,’ क्रिकेटच नाही चेसमध्येही फिरकीपटू माहिर, पाहा व्हिडिओ

On: बुधवार, मे 4, 2022 6:20 PM
R-Ashwin
---Advertisement---

भारतात सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा १५ वा हंगाम सुरू आहे. या हंगामात यावेळी राजस्थान रॉयल्स संघ चांगली कामगिरी करताना दिसून येत आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच राजस्थान रॉयल्सने पहिल्या ४ संघातील स्थान टिकवून ठेवले आहे. राजस्थानच्या या यशात युजवेंद्र चहल आणि आर अश्विन या दोन फिरकीपटूंचा मोठा वाटा आहे. दरम्यान, मैदानावर चांगली कामगिरी करत असतानाच मैदानाबाहेरही विविध गोष्टींमुळे अश्विन चर्चेत येत असतो. तो सध्या त्याच्या संघसहकाऱ्यांबरोबर मजामस्ती करतानाही दिसत आहे. 

नुकताच एक व्हिडिओ राजस्थान रॉयल्सने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अश्विन (R Ashwin) राजस्थान रॉयल्स संघातील (Rajasthan Royals) युवा क्रिकेटपटू यशस्वी जयस्वालबरोबर (Yashasvi Jaiswal) बुद्धिबळ खेळताना दिसत आहे. त्याचबरोबर तो काही कागदपत्रांवर काही लिहितानाही दिसत आहे. या व्हिडिओला राजस्थान रॉयल्सने कॅप्शन दिले आहे की, ‘प्रोफेसर अश्विनच्या डाव्या हाताचा खेळ.’

या शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये दिसते, अश्विन बुद्धिबळाच्या खेळातदेखील हुशारी दाखवत आहे. त्याने जयस्वालवर वर्चस्व बनवले आहे. तसेच तो त्याला सल्ला देतानाही दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजस्थान रॉयल्समधीलच फिरकीपटू युजवेंद्र चहल हा बुद्धिबळपटू असून क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवण्यापूर्वी त्याने बुद्धिबळ खेळात आपले नाव कमावले होते. पण, अश्विनबरोबर या व्हिडिओमध्ये तो दिसत नव्हता.

या व्हिडिओवर अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघानेही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले की, ‘एक एक हात होऊन जाऊ द्या.’

आर अश्विनने आयपीएल २०२२ हंगामात आत्तापर्यंत १० सामने खेळले असून ७.१० च्या इकोनॉमी रेटने ८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ८३ विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२२ साठी संघात कायम केले होते. पण त्याला या हंगामात फार छाप पाडण्यात यश आले नाही. त्याला केवळ या हंगामात ३ सामने खेळण्याचीच संधी देण्यात आली. तसेच तो देखील या ३ सामन्यात फार मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरला. त्याने ३ सामन्यात केवळ २५ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

एप्रिल महिन्यासाठी आयसीसीचे ‘प्लेयर ऑफ द मंथ’ नामांकन ‘या’ तिघांना, भारतीय वंशाचा क्रिकेटरही सामील

मोठी बातमी! साहाला धमकावणे पडले महागात, बीसीसीआयने केली मोठी कारवाई

गुजरात टायटन्सच्या मॅच फिनिशर तेवतियाचा फॅन बनले महान फलंदाज गावसकर, म्हटले ‘आइस मॅन’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---