fbpx
Thursday, February 25, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत ‘ही’ गोष्ट केल्यास अर्धी मिशी काढेन”, अश्विनचं पुजाराला अनोखं चॅलेंज 

Ravichandran Ashwin Promises To Shave Half His Moustache If Cheteshwar Pujara Completes This Challenge

January 26, 2021
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Curtsey: Twitter/ICC

Photo Curtsey: Twitter/ICC


भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याला त्याच्या दिलखुलास बोलण्याच्या स्वभावासाठी ओळखले जाते. ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध भिडणार आहे. या दौऱ्याची सुरुवात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. तत्पुर्वी अश्विनने भारतीय संघाची नवी ‘द वॉल’ चेतेश्वर पुजारा याला एक अनोखे आव्हान (चॅलेंज) दिले आहे. जर पुजाराने त्याचे आव्हान पूर्ण केले तर आपली अर्धी मिशी काढून टाकणार असल्याचे अश्विनने सांगितले आहे.

अश्विन भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्याशी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर चर्चा करत होता. यावेळी बोलता-बोलता पुजाराचा विषय निघाला. पुजारा याला भारतीय संघाचा ‘कसोटी स्पेशलिस्ट’ म्हणून ओळखले जाते. पुजारा मैदानावर अधिकतर संथ फलंदाजी करताना दिसतो. त्यामुळे त्याने हवेत जोरदार फटकेबाजी केल्याचे दृश्य क्वचितच पाहायला मिळते.

यावर अश्विनने राठोड यांना मजेशीर प्रश्न केला की, पुजाराने फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर हवेत फटका मारल्याचे भविष्यात आम्हाला कधी पाहायला मिळेल का?. “मी आजवर बऱ्याचदा पुजाराला फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर मोठे शॉट मारण्यास सांगितले आहेत. परंतु तो नेहमी काही-ना-काही कारण सांगून माझ्या या गोष्टीला टाळण्याचा प्रयत्न करत असतो”, असे उत्तर प्रशिक्षक राठोड यांनी अश्विनच्या प्रश्नावर दिले.

यानंतर पुढे मजेत बोलताना अश्विनने राठोड यांच्यापुढे पुजाराला आव्हान दिले. तो म्हणाला की, “जर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत पुजाराने फिरकीपटू मोईन अली किंवा त्यांच्या संघातील कोणत्याही फिरकी गोलंदाजांच्या चेंडूवर खेळपट्टीच्या बाहेर जात हवेत शॉट मारला; तर मी माझी अर्धी मिशी काढून टाकेन. एवढेच नव्हे तर, तशाच अर्ध्या मिशीसह मी मैदानावर खेळण्यासाठी उतरले.”

अश्विनचे हे आव्हान ऐकून राठोड यांना हसू आवरले नाही. त्यांनी हे आव्हान अतिशय गमतीशीर आणि भन्नाट आहे, असे म्हटले. तसेच त्यांनी अपेक्षा केली आहे की, पुजारा अश्विनचे हे आव्हान स्विकारेल.

लवकरच सुरू होणार भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका

भारत विरुद्ध इंग्लंड संघात ५ फ्रेबुवारीपासून चेन्नई येथे पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. ९ फेब्रुवारी रोजी हा सामना संपेल.  त्यानंतर १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान चेन्नईच्या मैदानावरच दुसरा कसोटी सामना पार पडले. २४ फेब्रुवारी आणि ४ मार्चपासून सुरु होणारे अखेरचे दोन कसोटी सामने अहमदाबाद येथे खेळवण्यात येतील.

तत्पुर्वी श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड संघाने कसोटी मालिकेत २-० ने यजमान संघाचा व्हाईटवॉश केला आहे. २७ जानेवारी रोजी इंग्लंडचे खेळाडू भारत दौऱ्यासाठी उड्डाण भरू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या-

“मिचेल स्टार्क ऐवजी दुसऱ्या गोलंदाजाला संघात स्थान द्या”, माजी कर्णधाराने केली मागणी

क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट 

पुन्हा घुमणार ‘सचिन..सचिन’ चा आवाज; सुरू होणार ‘ही’ मोठी स्पर्धा


Previous Post

आयपीएल २०२१ लिलावाची तारीख ठरली ! ‘या’ ठिकाणी होणार लिलाव

Next Post

“टी२० मालिका विजयानंतर विराटच्या ‘त्या’ कृत्याने डोळ्यात पाणी आणलं”, नटराजनने व्यक्त केल्या भावना

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ICC
इंग्लंडचा भारत दौरा

INDvENG 3rd Test Live: रुट, लीचच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाज गडगडले; भारताचा पहिला डाव १४५ धावावंर संपुष्टात

February 25, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCIDomestic
क्रिकेट

एकचं नंबर भावा! पृथ्वी शॉचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, विजय हजारे ट्रॉफीत शतकानंतर झुंजार द्विशतक 

February 25, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

जेव्हा ‘विक्रमादित्य ब्रॅडमन’ यांनी अवघ्या ३ षटकात झळकावले होते शतक

February 25, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

शतक हुकलं पण बनला नवा ‘सिक्सर किंग’, रोहित शर्मालाही सोडलं पिछाडीवर

February 25, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI/ANI
इंग्लंडचा भारत दौरा

मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान मोदींचं नाव; राहुल गांधी निशाणा साधत म्हणतात, ‘सत्य आपोआप समोर येते’

February 25, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

दु:खद! ‘या’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला झाला पितृशोक, कॅन्सरमुळे वडीलांचे निधन

February 25, 2021
Next Post

"टी२० मालिका विजयानंतर विराटच्या 'त्या' कृत्याने डोळ्यात पाणी आणलं", नटराजनने व्यक्त केल्या भावना

Photo Curtsey: Twitter/ICC

टीम इंडियापुढे इंग्लंडच्या 'या' गोलंदाजांचे आव्हान, श्रीलंकाविरुद्ध कसोटी मालिकेत घेतल्यात २२ विकेट्स

Photo Curtsey: Twitter/ICC

एकेकाळी ड्रेसिंग रूममध्ये बसून ढसाढसा रडणारा इंग्लंडचा खेळाडू करू शकतो टीम इंडियाला चितपट!

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.