मोहाली। भारत विरुद्ध श्रीलंका संघात पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम येथे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना झाला. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा दमदार लयीत दिसला. त्याने फलंदाजीचतच नाही, तर गोलंदाजीतही कमालीचे प्रदर्शन केले.
जडेजाचे पंचक
भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील पहिल्या सामन्यात भारताने पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकेच्या अर्ध्या संघाला रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) गुंडाळले. त्याने या डावात १३ षटकांत ४१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. एका डावात ५ विकेट्स जडेजाने तब्बल ५ वर्षांनी घेतल्या. यापूर्वी त्याने ऑगस्ट २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्धच कोलंबो येथे ५ विकेट्स घेतल्या होत्या.
दरम्यान, श्रीलंकेच्या पहिल्या डावात पाथम निसंका वगळता कोणत्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. निसंकाने ६१ धावांची खेळी केली. अन्य फलंदाज अपयशी ठरले. महत्त्वाचे म्हणजे शेवटच्या चार विकेट्स शुन्य धावेवर गेल्या. त्यामुळे श्रीलंकेचा पहिला डाव ६५ षटकात १७४ धावांवरच संपला.
जडेजाची फलंदाजीतही कमाल
जडेजाने भारताकजून पहिल्या डावात ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना २२८ चेंडूत १७५ धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने १७ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याने रिषभ पंत, आर अश्विन आणि मोहम्मद शमी असे तिघांबरोबर शतकी भागीदारी रचली. त्याच्याव्यतिरिक्त पंतने ९६ धावांची खेळी केली, तर अश्विनने ६१ धावांची खेळी केली. तसेच हनुमा विहारीने ५८ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने ५७४ धावांचा डोंगर उभा केला.
A 5⃣-wicket haul for @imjadeja as #TeamIndia wrap Sri Lanka innings for 174 ????????
Follow the match ▶️ https://t.co/XaUgOQVg3O#INDvSL | @Paytm pic.twitter.com/iJoGxRr6cY
— BCCI (@BCCI) March 6, 2022
जडेजाचे विक्रम
जडेजाने या सामन्यांतील पहिल्या डावांमध्ये केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे अनेक मोठे विक्रम केले आहेत. तो एकाच कसोटीत १५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी आणि एका डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी करणारा जगातील केवळ सहावा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी विनू मंकड, मुश्ताक मोहम्मद, डेनिस ऍटकिन्सन, पॉलि उम्रिगर, गॅरी सोबर्स यांनी अशी कामगिरी केली आहे. यातील जडेजासह विनू मंकड, मुश्ताक मोहम्मद आणि डेनिस ऍटकिन्सन हे चारच असे खेळाडू आहेत, ज्यांनी एकाच कसोटीत १७५ किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी आणि एका डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
तसेच जडेजाने ७ व्या क्रमांकावर खेळताना नाबाद १७५ धावांची खेळी केली असल्याने तो एकाच कसोटीत ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना १५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी आणि एका डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी करणारा डेनिस ऍटकिन्सन यांच्यानंतरचा दुसराच खेळाडू आहे. त्यांनी अशी कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९५५ साली केली होती.
याशिवाय जडेजा एकाच कसोटीत १५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी आणि एका डावात ५ विकेट्स (150+ Runs and 5 wickets haul) घेण्याची कामगिरी करणारा तिसराच भारतीय ठरला आहे. यापूर्वी विनू मंकड (Vinoo Mankad) आणि पॉलि उम्रिगर (Polly Umrigar) यांनी असा कारनामा केला होता. मंकड यांनी १९५२ साली इंग्लंडविरुद्ध १८४ धावा केल्या होत्या आणि १९६ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच उम्रिगर यांनी १९६२ साली वेस्ट इंडिज विरुद्ध नाबाद १७२ धावा केल्या होत्या आणि १०७ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या.
एकाच कसोटीत १५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी आणि एका डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी करणारे क्रिकेटपटू
विनू मंकड – १८४ धावा आणि ५१९६ विकेट्स, (भारत विरुद्ध इंग्लंड, १९५२)
डेनिस ऍटकिन्सन – २१९ धावा आणि ५५६ विकेट्स, (वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया, १९५५)
पॉलि उम्रिगर – १७२* धावा आणि ५१०७ विकेट्स, (भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, १९६२)
गॅरी सोबर्स – १७४ धावा आणि ५४१ विकेट्स, (वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, १९६६)
मुश्ताक मोहम्मद – २०१ धावा आणि ५४९ विकेट्स, (पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, १९७३)
रवींद्र जडेजा – १७५* धावा आणि ५४१ विकेट्स (भारत विरुद्ध श्रीलंका, २०२२)
महत्त्वाच्या बातम्या –
भारीच! स्नेह राणा-पुजा वस्त्राकर जोडीची पाकिस्तानविरुद्ध कमाल, एकाच वेळी दोन विश्वविक्रम नावावर
Ranji Trophy: अजिंक्य रहाणे गोल्डन डक, तर ‘या’ खेळाडूंचे तिसऱ्या सामन्यात कमाल प्रदर्शन
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेन वॉर्नचे ‘ते’ तीन सामने, ज्यांनी त्याला बनवले ‘फिरकीचा जादूगार’