विश्वचषक 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहलीने जबरदस्त फलंदाजी करत शानदार शतक झळकावले. भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने विराट कोहलीच्या या शानदार खेळीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. रवींद्र जडेजा म्हणाला की, विराट कोहलीसाठी हे शतक खूप खास असेल.
विराट कोहलीने वाढदिवसादिवशीच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त शतक झळकावले. त्याने 121 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने नाबाद 101 धावा केल्या. विराट कोहली (Virat Kohli) याच्या कारकिर्दीतील हे 49 वे शतक होते आणि आता त्याने सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरीही केली आहे. त्याने आपल्या वाढदिवसादिवशी शतक झळकावून आपला वाढदिवस आणखी खास बनवला.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या शतकाबाबत मोठे वक्तव्य केले. तो म्हणाला, “विराट कोहलीसाठी हे शतक खूप खास असेल असे मला वाटते. ही खेळपट्टी फलंदाजीसाठी तितकी सोपी नव्हती आणि इथे 260-270 धावाही पुरेशा होतील असे वाटत होते. त्याने स्ट्राईक चांगलाच रोटेट केला. त्यांचे फिरकी गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करत असतानाही तो फलंदाजी चांगली करत होता आणि त्यानी संघाची धावसंख्या ३०० च्या पुढे नेली.”
ईडन गार्डनवर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 50 षटकात 5 विकेट्स गमावून 326 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 27.1 षटकात केवळ 83 धावांवरच सर्वबाद झाला आणि त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघ याआधीच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. (Ravindra Jadeja big statement about Virat innings said Virat Kohli century)
म्हत्वाच्या बातम्या
सलमानला खोटं ठरवलं! सचिन जे 2012मध्ये बोलला ते विराटने करून दाखवलं, जुना व्हिडिओ तुफान व्हायरल
‘मी सचिनएवढा भारी कधीच नाही’, विराटचा भावूक झालेला व्हिडिओ जगभरात व्हायरल